Launch of paddy procurement | कोरचीतून धान खरेदीचा शुभारंभ
कोरचीतून धान खरेदीचा शुभारंभ

ठळक मुद्देमहामंडळाचा खरीप हंगाम : कोरची, मसेली येथील खरेदी केंद्राचे उद्घाटन
लोकमत न्यूज नेटवर्क
कोरची : आदिवासी विकास महामंडळाच्या गडचिरोली प्रादेशिक कार्यालयाअंतर्गत उपप्रादेशिक कार्यालय कोरची अंतर्गत मसेली व कोरची येथील आविका संस्थांच्या धान खरेदी केंद्राचे उद्घाटन करून प्रत्यक्ष धान खरेदीचा शुभारंभ १९ नोव्हेंबर रोजी मंगळवारला करण्यात आला.
आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था कोरचीच्या वतीने आधारभूत धान खरेदी केंद्राचे उद्घाटन तहसीलदार भंडारी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आविका संस्थेचे सभापती श्यामलाल मडावी, महामंडळाचे उपप्रादेशिक व्यवस्थापक चौधरी, आविका संस्थेचे संचालक मनोज अग्रवाल, भजन मोहुर्ले, विठ्ठल शेंडे, भिकम फुलकुवर, बिरसू कमरो, देवालू कपूरडेहरिया, प्रल्हाद चांग, आसाराम सांडिल, शंभू घावडे, बाळकृष्ण मारगाये, दिवाकर शेंडे यांच्यासह हमालवर्ग उपस्थित होता.
आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने कोरची तालुक्यात यंदाच्या खरीप हंगामात कोटरा, कोरची, बेतकाठी, मर्केकसा, बेडगाव, बोरी, मसेली, कोटगूल आदी धान खरेदी केंद्र मंजूर केले असून तालुक्यात दोन ते तीन केंद्रावर खरेदीचा शुभारंभ मंगळवारी झाला. उर्वरित धान खरेदी केंद्र बुधवारी व गुरूवारला सुरू होणार असल्याची माहिती महामंडळाच्या सूत्रांकडून मिळाली आहे.
आविकास संस्थांच्या विविध मागण्या प्रलंबित असल्याने खरेदी केंद्र मंजूर होऊनही संस्थांनी धान खरेदीचे काम सुरू केले नव्हते. दरम्यान महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी थकीत कमिशनची रक्कम आविका संस्थेच्या खात्यात वळते केले आहे. कुरखेडा तालुक्यातील धान खरेदी केंद्र सुरू होणार आहेत.

‘अ’ प्रतीच्या धानाला १८३५ रुपये भाव
राज्य शासनाने यावर्षी आधारभूत धान खरेदी योजनेअंतर्गत ‘अ’ प्रतीच्या धानाला प्रती क्विंटल १ हजार ८३५ रुपये व ‘क’ प्रतीच्या धानाला १ हजार ८१५ रुपये भाव दिला जात आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा भाव वाढले आहेत. त्यामुळे आदिवासी विकास महामंडळाच्या केंद्रांवर धानाची आवक वाढण्याची शक्यता आहे.

Web Title: Launch of paddy procurement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.