वनहक्कधारकांसाठी सिंचन विहीर याेजना सुरू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:37 IST2021-04-07T04:37:45+5:302021-04-07T04:37:45+5:30
पावसाच्या पाण्यावरच शेतकरी शेती करतात. अनियमित पाऊस व अन्य कारणांमुळे शेतातील पीक अंतिम टप्प्यात करपते. शेतकऱ्यांनी केलेला खर्च ...

वनहक्कधारकांसाठी सिंचन विहीर याेजना सुरू करा
पावसाच्या पाण्यावरच शेतकरी शेती करतात. अनियमित पाऊस व अन्य कारणांमुळे शेतातील पीक अंतिम टप्प्यात करपते. शेतकऱ्यांनी केलेला खर्च वाया जाताे. त्यामुळे वनहक्कधारक शेतकऱ्यांना सिंचन विहिरींची गरज आहे. ‘मागेल त्याला शेततळे’ तसेच धडक सिंचन विहीर या धर्तीवर वनहक्कधारकांसाठी सिंचन विहीर याेजना सुरू केल्यास संपूर्ण शेतकऱ्यांचा सिंचनाचा लाभ मिळेल. जिल्ह्यात अनेक शेतकरी सिंचनाच्या प्रतीक्षेत आहेत. परंतु त्यांना अद्यापही विहीर अथवा अन्य साधनांचा लाभ मिळाला नाही.
गडचिराली जिल्हा दुर्गम व नक्षलग्रस्त आहे. शासनाच्या याेजना पाेहाेचण्यास अडचणी येत आहेत. याशिवाय नागरिकांना याेजनांची माहिती मिळत नसल्याने त्यांचा विकास रखडला आहे. शेतऱ्यांची स्थिती अतिशय दयनीय आहे. त्यामुळे शासनाने शेतकरी हिताच्या याेजना राबविण्याची गरज आहे. दरवर्षी अनेक शेतकरी वनहक्काची मागणी करतात; परंतु त्यांच्या मागणीला गांभीर्याने घेतले जात नाही. त्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहे.