शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठासाठीच्या जमिनीचे भाव घटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2020 06:00 IST

शासनाने या प्रस्तावानुसार निधी उपलब्ध करून दिला. त्यानंतर जमीन अधिग्रहणाच्या प्रक्रियेला सुरूवात झाली. जिल्हास्तरीय मूल्यांकन समितीने मूल्यांकन केले. यामध्ये ९ लाख ३२ हजार रुपये प्रती हेक्टर मूळ दर ठरविण्यात आला होता. शासनाच्या नियमाप्रमाणे या मूळ दराच्या जवळपास पाच पट किंमत व इतर बाबींसाठी अधिकची किमत देण्यात आली होती. त्यामुळे शेतकऱ्यांना जवळपास २४ लाख रुपये एकर एवढा भाव मिळणार होता.

ठळक मुद्देजमीन देण्यास नकार : मूळ दर नऊ लाखांवरून सहा लाखांवर

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : विद्यापीठासाठी अधिग्रहीत करायच्या जमिनीचे भाव घटविल्याने शेतकरी नाराज झाले असून विद्यापीठास जमीन देण्यास स्पष्टपणे शेतकऱ्यांनी नकार दिला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची जमीन अधिग्रहीत करणे महसूल प्रशासनासाठी आव्हान ठरणार आहे.गोंडवाना विद्यापीठासाठी आरमोरी मार्गावरील कठाणी नदी नजीकची ७९ हेक्टर आर जमीन अधिग्रहीत करायची आहे. अगदी सुरूवातीला विद्यापीठाने रेडीरेकनर दरा प्रमाणे शासनाकडे ८९ कोटी रुपयांचा प्रस्ताव पाठवला. शासनाने या प्रस्तावानुसार निधी उपलब्ध करून दिला. त्यानंतर जमीन अधिग्रहणाच्या प्रक्रियेला सुरूवात झाली. जिल्हास्तरीय मूल्यांकन समितीने मूल्यांकन केले. यामध्ये ९ लाख ३२ हजार रुपये प्रती हेक्टर मूळ दर ठरविण्यात आला होता. शासनाच्या नियमाप्रमाणे या मूळ दराच्या जवळपास पाच पट किंमत व इतर बाबींसाठी अधिकची किमत देण्यात आली होती. त्यामुळे शेतकऱ्यांना जवळपास २४ लाख रुपये एकर एवढा भाव मिळणार होता. मात्र काही सिनेट सदस्यांनी प्रश्न उपस्थित केल्याने पुन्हा जमिनीचे मूल्यांकन करण्यात आले. त्यामध्ये मूळ दर ६ लाख ९ हजार रुपये एवढा ठरविण्यात आला आहे. नवीन दराप्रमाणे शेतकऱ्यांना जवळपास २० लाख रुपये एकर एवढीच किमत मिळणार आहे.जिल्हा मूल्यांकन समितीने ठरविलेल्या नवीन दराची माहिती देण्यासाठी विद्यापीठात शुक्रवारी शेतकऱ्यांची सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेला बहुतांश शेतकरी उपस्थित होते. कमी झालेल्या दराबाबतची माहिती विद्यापीठ प्रशासनाने शेतकऱ्यांना दिल्यानंतर शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त करीत विद्यापीठाला जमीन देण्यास स्पष्ट नकार दिला. भाजीपाल्याच्या दराप्रमाणे प्रत्येक वेळी जमिनीचे भाव घटविले जात आहेत. विद्यापीठाला जमीन देणे परवडणारे नाही, अशी प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.महामार्गाला जमीन लागून असलेल्यांनाही अधिकचा भाव नाहीपाच ते सहा शेतकऱ्यांची जमीन राष्ट्रीय महामार्गाला लागून आहे. शेतकºयांनी कालव्यासाठी स्वत:ची जमीन उपलब्ध करून दिली. अगदी सुरूवातीला राष्ट्रीय महामार्गाला लागून असल्याचा भाव निश्चित करण्यात आला होता. मात्र त्यानंतर पुन्हा मोजणी करून कालवा असल्याने जमीन राष्ट्रीय महामार्गाला लागून नाही, असा शेरा मूल्यांकन समितीने मारला. मात्र सदर जमीन शेतकऱ्यांनी शासनाला विक्रीपत्र करून दिली नसून ती केवळ शासकीय उपयोगासाठी शासनाला दिली आहे. कालव्याच्या जमिनीचा मूळ मालक शेतकरीच आहे. असे असतानाही या शेतकऱ्यांना कमी दर दिला जात आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांनी तर जमीन देण्यास स्पष्ट नकार दिला आहे. खुल्या बाजारातही या जमिनीचा भाव विद्यापीठ देत असलेल्या भावापेक्षा अधिक आहे.

टॅग्स :universityविद्यापीठ