शहरं
Join us  
Trending Stories
1
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
2
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
3
व्यावसायिकनंतर ५ किलोच्या सिलेंडरच्या किमतीतही मोठी वाढ, आता मोजावे लागणार एवढे रुपये
4
Top Marathi News LIVE Updates: 'मीसिंग लिंक'चं आज उद्घाटन; मुंबई-पुणे प्रवास वेगवान, बोगद्याची नोंद गीनिज बुकात
5
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा उद्या निकाल, रिझल्ट कुठे व कसा पाहायचा? A टू Z माहिती
6
"माझ्या डोळ्यांदेखतच माझी पत्नी आणि नातू..." जबलपूर दुर्घटनेतून वाचलेल्या पर्यटकाचा टाहो!
7
"तू बिकीनी घाल, मला तुला 'तसं' पाहायचंय..."; दिग्दर्शकाने अभिनेत्रीकडे केलेली विचित्र मागणी
8
Vodafone Idea ला संजीवनी, सरकारचा २३ हजार कोटींचा दिलासा; का देण्यात आली ही सूट?
9
Jabalpur Cruise Boat Accident: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
10
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
11
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
12
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
13
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
14
Raja Shivaji: डोक्यावर भगवा फेटा अन् पिळदार मिश्या, 'राजा शिवाजी'मधील सलमानची झलक समोर
15
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
16
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
17
कोणाच्या दबावाने यूएईने ‘ओपेक’ची साथ सोडली?; अरब देशांच्या सामूहिक शक्तीला मोठा तडा
18
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
19
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
20
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
Daily Top 2Weekly Top 5

मजुरांसाठी धावली लालपरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2020 05:01 IST

राजस्थान, मध्यप्रदेश, आसाम, तामिलनाडू, आंध्रप्रदेश, तेलंगणा आदी राज्यातील मजूर लॉकडाऊनमुळे गडचिरोली जिल्ह्यात अडकून पडले होते. या मजुरांना देसाईगंज, नागपूर येथे सोडून देण्यात आले आहे. लॉकडाऊनच्या कालावधी इतर सर्व सेवा बंद होत्या. तसेच मजुरांच्या गर्दीमुळे वाहक, चालकांना कोरोनाचा संसर्ग होण्याची भीती असतानाही एसटी कर्मचाऱ्यांनी मजुरांना त्यांच्या गावापर्यंत सोडून दिले.

ठळक मुद्देअडचणीच्या काळात मदत : लॉकडाऊनच्या कालावधित अडीच हजार मजुरांना पोहोचविले घरी

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : लॉकडाऊनमुळे सेवा बंद असल्याने एसटीवरील आर्थिक संकट अधिकच गडद झाले आहे. अशाही परिस्थितीत एसटीने सामाजिक जबाबदारी पार पाडताना जिल्हाभरातील जवळपास २ हजार ५०० मजुरांना त्यांच्या गावापर्यंत एसटीने पोहोचवून दिले आहे.केंद्र शासनाने ४ मे पासून मजुरांना त्यांच्या घरी जाण्याची परवानगी दिली. गडचिरोली जिल्ह्यातील बहुतांश मजूर तेलंगणा राज्यात मिरची तोडण्यासाठी गेले होते. या मजुरांना तेलंगणा राज्यातील वाहने आष्टी, सिरोंचा येथे सोडत होते. लॉकडाऊनच्या कालावधीत सर्वच खासगी वाहनांची सेवा बंद असल्याने एसटीशिवाय पर्याय नव्हता. अशा संकटकाळात एसटीने सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवत मजुरांना त्यांच्या गावापर्यंत पोहोचवून दिले आहे. विशेष म्हणजे शारीरिक अंतर ठेवून प्रवाशी बसविल्याने एसटीच्या प्रवाशी क्षमतेच्या केवळ अर्धेच प्रवाशी बसविले जात होते. त्यामुळे एसटीचा खर्चही भरून निघणे कठीण होते. तरीही एसटी बसगाड्या सोडण्यात आल्या. प्रत्यक्ष त्यांच्या गावापर्यंत मजुरांना सोडण्यात आले.आंध्रप्रदेश राज्यातून काही मजूर रेल्वेने देसाईगंज येथे आले. या प्रवाशांनाही त्यांच्या गावी सोडण्यात आले. काही प्रवाशी चालत गडचिरोलीपर्यंत पोहोचत होते. गडचिरोली येथील बसस्थानकात पोहोचल्यानंतर एसटीने सोडून देण्याची विनवणी करीत होते. अशाही प्रवाशांना एसटीने त्यांच्या गावार्यंत सोडून दिले आहे.राजस्थान, मध्यप्रदेश, आसाम, तामिलनाडू, आंध्रप्रदेश, तेलंगणा आदी राज्यातील मजूर लॉकडाऊनमुळे गडचिरोली जिल्ह्यात अडकून पडले होते. या मजुरांना देसाईगंज, नागपूर येथे सोडून देण्यात आले आहे. लॉकडाऊनच्या कालावधी इतर सर्व सेवा बंद होत्या. तसेच मजुरांच्या गर्दीमुळे वाहक, चालकांना कोरोनाचा संसर्ग होण्याची भीती असतानाही एसटी कर्मचाऱ्यांनी मजुरांना त्यांच्या गावापर्यंत सोडून दिले. गावापर्यंत पोहोचलेल्या मजुरांच्या चेहऱ्यावर एसटीच्या मदतीमुळे हास्य उमलल्याचे दिसून येत होते.पायदळ मजूर आशेने गाठतात बसस्थानकचंद्रपूर व इतर जिल्ह्यातून काही मजूर अजूनही परत येत आहेत. सदर मजूर गडचिरोलीपर्यंत मालवाहू किंवा इतर साधनाने येतात. गडचिरोली येथे आल्यानंतर सर्वप्रथम बसस्थानक गाठतात. या मजुरांसाठी बससेवा उपलब्ध करून दिली जात आहे. कोरोनाच्या भीतीमुळे खासगी बसचालकांनी सेवा पूर्णपणे बंद केली आहे. अशा परिस्थितीत मजूर व सामान्य व्यक्तीच्या मदतीला एसटी धावून आली आहे.एसटीने आजपर्यंत अनेक चढ-उतार बघितले आहेत. एसटीने उत्पन्नापेक्षा सामाजिक जबाबदारीला नेहमीच प्राधान्य दिले आहे. लॉकडाऊनच्या कालावधीत निम्मेच प्रवाशी बसविण्याचे निर्देश केंद्र शासनाने दिले आहेत. एवढे प्रवाशी बसवून एसटी चालविणे कठीण आहे. मात्र लॉकडाऊनच्या कालावधीत मजुरांचे हाल होऊ नयेत, यासाठी बसेस सोडण्यात आल्या. अडचणीच्या काळात एसटी मजुरांच्या मदतीसाठी धाऊन गेली, याचे समाधान आहे.- अशोककुमार वाडीभस्मे,विभाग नियंत्रक, गडचिरोली

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याstate transportएसटी