प्रसूत महिलेचे हाल : दोन नागपुरात; एक गडचिरोलीत

By Admin | Updated: June 28, 2014 00:47 IST2014-06-28T00:44:10+5:302014-06-28T00:47:40+5:30

येथील जिल्हा सामान्य रूग्णालयातील तीन रूग्णवाहिका दुरूस्तीसाठी शोरूममध्ये पाठविण्यात आल्या आहेत.

Ladies & # 39; Ladies & # 39; A Gadchiroli | प्रसूत महिलेचे हाल : दोन नागपुरात; एक गडचिरोलीत

प्रसूत महिलेचे हाल : दोन नागपुरात; एक गडचिरोलीत

गडचिरोली : येथील जिल्हा सामान्य रूग्णालयातील तीन रूग्णवाहिका दुरूस्तीसाठी शोरूममध्ये पाठविण्यात आल्या आहेत. सध्या तीन रूग्णवाहिकेवरच रूग्णांना वाहतुकीची सेवा पुरविण्यात येत आहे. दुरूस्तीसाठी दोन रूग्णवाहिका नागपुरात व एक रूग्णवाहिका गडचिरोलीत पाठविण्यात आली आहे. पुरेशा रूग्णवाहिकेअभावी येथील प्रसूत महिला रूग्णांचे हाल होत आहेत.
शासनाच्या आरोग्य विभागाने येथील जिल्हा सामान्य रूग्णालयाला आरोग्य सेवेसाठी पाच रूग्णवाहिका व एक सुमो गाडी दिलेली आहे. सहा गाड्यापैकी तीन रूग्णवाहिका व एक सुमो दुरूस्तीसाठी शोरूममध्ये पाठविल्या आहेत. सध्या दोन रूग्णवाहिका सेवेत असून एक रूग्णवाहिका धानोरा उपजिल्हा रूग्णालयातून तात्पुरत्या स्वरूपात मागविण्यात आली आहे. या रूग्णालयातील रूग्णांची संख्या बघता तीन रूग्णवाहिका कमी पडत असून रूग्णांच्या आरोग्य सेवेवर परिणाम होत आहे. रूग्णालयाच्या तीन रूग्णवाहिका गेल्या १५ ते २० दिवसापासून बिघाड अवस्थेत आहते. नागपुरात पाठविलेल्या एका रूग्णवाहिकेच्या दुरूस्तीचे काम पूर्ण झाले आहे. या रूग्णवाहिकेच्या दुरूस्तीचे १४ हजार रूपये बिल झाले असल्याची माहिती आहे. सदर रक्कम अदा करून ही रूग्णवाहिका गडचिरोली येथे आणायची आहे. ही रूग्णवाहिका दुरूस्ती होऊन चार दिवसाचा कालावधी लोटला आहे. रूग्णवाहिकेच्या दुरूस्तीचा खर्च राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानामार्फत केल्या जाते. सध्या एका रूग्णवाहिकाच्या सहाय्याने येथील गंभीर रूग्णांना रेफर केले जात आहेत. दोन रूग्ण्वाहिकांच्या सहाय्याने प्रसुती झालेल्या महिलांना जननी सुरक्षा योजनेंतर्गत त्यांच्या गावी पोहोचविण्यात येत असल्याची माहिती रूग्णालयाच्या सूत्रांकडून मिळाली आहे. सामान्य रूग्णाालयात जिल्ह्यासह बाहेर जिल्ह्यातील अनेक रूग्ण दररोज येऊन दाखल होतात. जुनी सुमो गाडी गेल्या अनेक दिवसापासून बिघाड अवस्थेत असून ती पूर्णत: खराब झाली आहे. ती नादुरूस्त अवस्थेत रूग्णालयात पडून आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
बाहेर जिल्ह्यातील प्रसूत महिला रूग्णांना त्रास
रूग्णालयात प्रसुती झालेल्या महिला रूग्णांना जननी सुरक्षा योजनेंतर्गत त्यांच्या गावी रूग्णवाहिकेने मोफत पोहोचवून देण्याची सुविधा आहे. जिल्हा सामान्य रूग्णालयात सध्या तीनच रूग्णवाहिका असल्याने केवळ गडचिरोली जिल्ह्यातील प्रसुती महिला रूग्णांना पोहोचवून देण्यात येत आहे. पुरेशा रूग्णवाहिकेअभावी बाहेर जिल्ह्यातील प्रसुती महिला रूग्णांना ही सेवा बंद करण्यात आली आहे. यामुळे बाहेर जिल्ह्यातील प्रसुती महिला रूग्णांना त्रास होत आहे.
सामान्य रूग्णालयातील तीन रूग्णवाहिका दुरूस्तीसाठी शोरूममध्ये पाठविण्यात आल्या आहेत. यापैकी एका रूग्णवाहिकेच्या दुरूस्तीचे काम पूर्ण झाले असून ही रूग्णवाहिका उद्या रूग्णांच्या सेवेत दाखल होणार आहे. रूग्णांची हेळसांड होऊ नये याकरीता धानोरा येथील उपजिल्हा रूग्णालयातून एक रूग्णवाहिका तात्पुरत्या स्वरूपात मागविण्यात आली आहे. उपलब्ध रूग्णवाहिकेच्या माध्यमातून रूग्णांना सेवा दिली जात आहे.
- डॉ. अनिल रूडे, निवासी वैद्यकीय अधिकारी

Web Title: Ladies & # 39; Ladies & # 39; A Gadchiroli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.