गाेंधळलेल्या काेराेनाबाधितांना मार्गदर्शनाचा अभाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 05:00 IST2021-04-20T05:00:00+5:302021-04-20T05:00:27+5:30
मागील आठ दिवसांमध्ये काेराेना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. तसेच मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तालुकास्तरावर काही ठिकाणी रुग्णालये व काेविड केअर सेंटर आहेत. काेराेना पाॅझिटिव्ह आल्यानंतर संबंधित रुग्णाला कुठे भरती करावे, काेविड केअर सेंटरमध्ये बेड उपलब्ध आहेत काय, नसल्यास काेणती पर्यायी सुविधा उपलब्ध आहे,

गाेंधळलेल्या काेराेनाबाधितांना मार्गदर्शनाचा अभाव
लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिराेली : काेराेनाची लागण झाली किंवा काेराेनाची लक्षणे दिसून येत आहेत, अशा स्थितीत काय करावे, काेणत्या रुग्णालयात भरती व्हावे, रुग्णालयात ऑक्सिजन बेड उपलब्ध आहेत काय आदी प्रश्नांची माहिती देण्यासाठी विशिष्ट यंत्रणा असणे आवश्यक आहे. मात्र अशी यंत्रणा गडचिराेली जिल्ह्यात उपलब्ध नसल्याने नेमके काय करावे, असा प्रश्न काेराेना संशयित रुग्णासह नातेवाइकांसमाेर निर्माण झाला आहे.
मागील आठ दिवसांमध्ये काेराेना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. तसेच मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तालुकास्तरावर काही ठिकाणी रुग्णालये व काेविड केअर सेंटर आहेत. काेराेना पाॅझिटिव्ह आल्यानंतर संबंधित रुग्णाला कुठे भरती करावे, काेविड केअर सेंटरमध्ये बेड उपलब्ध आहेत काय, नसल्यास काेणती पर्यायी सुविधा उपलब्ध आहे, रुग्णालयात ऑक्सिजन बेड उपलब्ध आहेत की नाही, याची माहिती देण्याची जबाबदारी एका विशिष्ट कर्मचारी किंवा अधिकाऱ्यावर साेपविणे आवश्यक आहे. मात्र अशी यंत्रणा गडचिराेली शहरात आणि जिल्ह्यात नाही. त्यामुळे कुणाशी संपर्क साधावा असा प्रश्न निर्माण झाला आहे.
न.प.मध्ये वाॅररूमच नाही
काेराेनाचे संकट लक्षात घेता काही जिल्ह्यांमध्ये वाॅररूम तयार करण्यात आल्या आहेत. पण गडचिराेली शहरात अजुनही वाॅररूम नाही.
हाेम आयसाेलेशन असणाऱ्यांकडे विशेष लक्ष ठेवण्याची गरज
सामान्य लक्षणे असलेल्या रुग्णाला घरीच राहून उपचार घेण्याचा सल्ला दिला जातो. या रुग्णाला काही डाॅक्टरांचे माेबाइल क्रमांक दिले जातात. या डाॅक्टारांशी संपर्क न झाल्यास वाॅररूमला संपर्क साधता येईल.
रुग्णांसाेबत संपर्क साधता येईल अशी यंत्रणा असावी
काेराेना वाॅर्डात रुग्णाच्या नातेवाइकाला साेबत राहू दिले जात नाही. काही रुग्णांकडे माेबाइल राहत नाही. तसेच गंभीर स्थितीतील रुग्णांकडे माेबाइल असला तरी ताे बाेलू शकत नाही. त्यामुळे त्याची स्थिती कशी आहे, याची माहिती नातेवाइकांना कळत नाही. रुग्णासाेबत नातेवाईक संपर्क साधू शकतील किंवा त्याची स्थिती कळू शकेल ही यंत्रणा असण्याची गरज आहे.
जिल्ह्यात काही काेविड केअर सेंटर तसेच रुग्णालयांमध्ये काेराेना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. प्रत्येक रुग्णालयाची जबाबदारी एका कर्मचाऱ्यावर साेपवावी. दूरध्वनी क्रमांक किंवा माेबाइल क्रमांक सार्वजनिक करावा जेणेकरून नागरिक रुग्णालयातील स्थिती जाणू शकतील.