शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

एमआयडीसीत सुविधांचा अभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2019 06:00 IST

वनसंपदा व नैसर्गिक संपदेने नटलेल्या गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कच्चा माल आहे. या कच्च्या मालावर आधारीत उद्योग सुरू करण्यासाठी चांगला वाव आहे. उद्योग स्थापन करण्यासाठी जमीन, पाणी, मजूर, वीज व भांडवल या गोष्टी आवश्यक आहेत.

ठळक मुद्देआठ वर्षांपासून दुर्लक्ष : अहेरी उपविभागात बेरोजगारीची समस्या गंभीर

लोकमत न्यूज नेटवर्कअहेरी : अहेरी येथे शासनाने एमआयडीसी स्थापन केली. मात्र या ठिकाणी उद्योगांसाठी आवश्यक असलेल्या सोयीसुविधा निर्माण करून दिल्या नाही. त्यामुळे उद्योजकांनी एमआयडीसीकडे पाठ फिरविली आहे. केवळ एमआयडीसीचा बोर्ड झळकत आहे.वनसंपदा व नैसर्गिक संपदेने नटलेल्या गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कच्चा माल आहे. या कच्च्या मालावर आधारीत उद्योग सुरू करण्यासाठी चांगला वाव आहे. उद्योग स्थापन करण्यासाठी जमीन, पाणी, मजूर, वीज व भांडवल या गोष्टी आवश्यक आहेत. या सर्व बाबी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने अहेरी येथे एमआयडीसीची स्थापना करण्यात आली. मात्र हा केवळ सोपस्कार ठरला आहे. एमआयडीसी स्थापन होऊन आठ वर्षांचा कालावधी उलटला तरी शासनाने या ठिकाणी कोणत्याही सोयसुविधा निर्माण करून दिल्या नाहीत. सुविधा नसल्याने उद्योजकांनी सुध्दा पाठ फिरविली आहे. अहेरी येथील एमआयडीसी प्राणहिता नदीच्या तिरावर आहे. त्यामुळे येथील उद्योगांना मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध होऊ शकते. मात्र इतर सुविधा नसल्याने उद्योजकांची अडचण झाली आहे. एकीकडे बेरोजगारी वाढत असताना शासन मात्र उद्योगांना चालना देण्याकडे व सोयीसुविधा पुरविण्याकडे दुर्लक्ष केले असल्याचे दिसून येते. उद्योग नसल्याने येथील जनतेला केवळ शेतीच्या भरवशावर अवलंबून राहावे लागते. शेतीतून केवळ चार महिन्यांचा रोजगार उपलब्ध होतो. उर्वरित कालावधीत मात्र बेरोजगारीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे राहणीमानाचा दर्जा उंचावण्याऐवजी खालावत चालला आहे. तरूण वर्ग विविध व्यसनांच्या आहारी जात आहे. अहेरी येथील एमआयडीसीत सोयीसुविधा पुरवाव्या, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.वनोद्योग उभारावेअहेरी उपविभागातील सर्वच तालुके जंगलाने व्यापले आहेत. जंगलातील लाकडाचा वन विभाग लिलाव करते. येथील लाकूड विविध राज्यांमध्ये पाठविला जाते. वनोपजाची सुध्दा अत्यंत कमी दराने विक्री केली जाते. वनोपज व लाकडावर आधारीत उद्योग स्थापन केल्यास स्थानिक युवकांना रोजगार मिळण्यास मदत होईल. 

टॅग्स :MIDCएमआयडीसी