शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
2
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
3
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
4
Gold Silver Price Today 1 May: महिन्याच्या पहिल्या दिवशी चांदी ₹५००० नं महागली, सोन्याचे दर घसरले; पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K गोल्डचा भाव
5
नागरिकत्व नियमांमध्ये मोठे बदल! अल्पवयीन मुलांसाठी पासपोर्टचे नियम अधिक कडक, OCI नोंदणी ऑनलाइन
6
मुंबईत आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेटवर मोठी कारवाई, ३४९ किलो हाय-ग्रेड कोकेन पकडले, किंमत हजारो कोटींमध्ये 
7
बजाजचा बाजारात धमाका! नवीन Pulsar NS400Z लॉन्च; किंमत झाली कमी अन् फीचर्समध्येही तडजोड नाही
8
LPG Price Hike: या वर्षी १५०० रुपयांपर्यंत वाढले कमर्शिअल सिलिंडरचे दर; का वाढले LPG चे रेट?
9
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
10
व्यावसायिकनंतर ५ किलोच्या सिलेंडरच्या किमतीतही मोठी वाढ, आता मोजावे लागणार एवढे रुपये
11
राजश्री देशपांडेने आत्मविश्वासाने दाखवल्या ब्रेस्ट कॅन्सरच्या खुणा, फोटो शेअर करत म्हणाली...
12
HSC Result 2026 Date: बारावीचा निकाल अवघ्या काही तासांवर! रिझल्ट कुठे आणि कसा पाहायचा? A टू Z माहिती
13
"माझ्या डोळ्यांदेखतच माझी पत्नी आणि नातू..." जबलपूर दुर्घटनेतून वाचलेल्या पर्यटकाचा टाहो!
14
"तू बिकीनी घाल, मला तुला 'तसं' पाहायचंय..."; दिग्दर्शकाने अभिनेत्रीकडे केलेली विचित्र मागणी
15
Vodafone Idea ला संजीवनी, सरकारचा २३ हजार कोटींचा दिलासा; का देण्यात आली ही सूट?
16
Jabalpur Cruise Boat Accident: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
17
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
18
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
19
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
20
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

सरासरीच्या तुलनेत जिल्ह्यात 21 टक्के पावसाची कमतरता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 05:00 IST

केवळ सिरोंचा तालुक्यात आतापर्यंत पडणाऱ्या सरासरीच्या तुलनेत १०३ टक्के पाऊस झाला आहे. उर्वरित एकाही तालुक्यात १०० टक्के पाऊस झालेला नाही. १ जूनपासून १७ ऑगस्टपर्यंत जिल्ह्यात ८७२.७ मि.मी. पाऊस होणे अपेक्षित असते. मात्र, प्रत्यक्षात ६९०.४ मि.मी. पाऊस बरसला आहे. हे प्रमाण ७९.१ टक्के आहे. आतापर्यंत सर्वाधिक ८४८.६ मि.मी. पाऊस भामरागड तालुक्यात झाला आहे; पण दरवर्षी पडणाऱ्या पावसाच्या तुलनेत हे प्रमाण कमीच आहे.

मनोज ताजनेलाेकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : अर्ध्यापेक्षा जास्त पावसाळा संपला असला तरी जिल्ह्याच्या बहुतांश भागात अजूनही सरासरीएवढा पाऊस झालेला नाही. त्यामुळे यावर्षी पिकांसोबत पिण्याच्या पाण्याचीही समस्या उद्भवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. केवळ सिरोंचा तालुक्यात आतापर्यंत पडणाऱ्या सरासरीच्या तुलनेत १०३ टक्के पाऊस झाला आहे. उर्वरित एकाही तालुक्यात १०० टक्के पाऊस झालेला नाही. १ जूनपासून १७ ऑगस्टपर्यंत जिल्ह्यात ८७२.७ मि.मी. पाऊस होणे अपेक्षित असते. मात्र, प्रत्यक्षात ६९०.४ मि.मी. पाऊस बरसला आहे. हे प्रमाण ७९.१ टक्के आहे. आतापर्यंत सर्वाधिक ८४८.६ मि.मी. पाऊस भामरागड तालुक्यात झाला आहे; पण दरवर्षी पडणाऱ्या पावसाच्या तुलनेत हे प्रमाण कमीच आहे. सिरोंचा तालुक्यात ७७५ मि.मी. पाऊस बरसला आहे. मात्र, १७ ऑगस्टपर्यंत या तालुक्यात सरासरी ७५० मि.मी. पाऊस पडतो. त्या तुलनेत प्रत्यक्ष पडलेला पाऊस जास्त असून, हे प्रमाण १०३.३ टक्के आहे. पावसाचे हे प्रमाण शेतकऱ्यांसाठी मारक ठरले आहे. सिंचनाची सुविधा नसलेल्या अनेक भागांत धानाची रोवणी होऊ न शकल्याने शेतकऱ्यांचे पऱ्हे वाया जाण्याची स्थिती निर्माण झाली आहे. 

गेल्या वर्षीपेक्षा कमी पाऊसगेल्या वर्षी म्हणजे १७ ऑगस्ट २०२० पर्यंत जिल्ह्यात ८२३ मि.मी. पाऊस बरसला होता. सरासरीच्या तुलनेत तो ९४.४ मि.मी. होता. यावर्षी मात्र ६९० मि.मी.च झाला असून, त्याची सरासरी ७९.१ मि.मी. एवढी आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत १५ टक्के पाऊस कमी आहे. पुढील दीड महिन्यात ही कसर भरून निघणार का, याकडे शेतकऱ्यांसह सर्वांचे लक्ष लागले आहे.

गडचिरोली, धानोरा तालुक्यात सर्वाधिक वाईट स्थितीजिल्ह्यातील १२ तालुक्यांच्या तुलनेत पावसाची सर्वांत वाईट स्थिती धानोरा तालुक्यात आहे. या तालुक्यात अवघा ५७ टक्के पाऊस झाला आहे. याशिवाय गडचिरोली तालुक्यातही ६३ टक्केच पाऊस बरसला आहे. बाकी तालुक्यांमध्ये ७० ते ८५ टक्के पाऊस बरसल्याचे दिसून येते. धानोरा तालुक्यात सिंचनाच्या सुविधा नसल्यामुळे पिकांची स्थिती वाईट आहे.

 

टॅग्स :Rainपाऊस