कोनसरीचा लोहप्रकल्प अधांतरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:34 IST2021-05-01T04:34:18+5:302021-05-01T04:34:18+5:30
लोहप्रकल्प जिल्ह्यातच व्हावे, यासाठी तत्कालीन राज्य सरकार व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः येऊन कोनसरी येथे लोहप्रकल्पाच्या कोनशीला शिलान्यासचे ...

कोनसरीचा लोहप्रकल्प अधांतरी
लोहप्रकल्प जिल्ह्यातच व्हावे, यासाठी तत्कालीन राज्य सरकार व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः येऊन कोनसरी येथे लोहप्रकल्पाच्या कोनशीला शिलान्यासचे उद्घाटन करून पायाभरणी केली. हा केवळ दिखावा झाला असून, कच्चा माल मात्र प्रत्यक्षात बाहेर जिल्ह्यात वाहतूक केली जात आहे, हे अन्यायकारक असून, अजून उशीर झाला, तरी चालेल; पण प्रकल्प कोनसरी येथे व विशेषतः स्थानिक सुशिक्षित बेरोजगारांनाच कामावर सामावून घ्यावे अन्यथा येथील एक इंच जागेची व कणभर कच्च्या मालाची उचल करू देणार नाही, असा सज्जड इशाराही रवींद्र वासेकर यांनी दिला आहे.
लोहप्रकल्पासाठी कोनसरी येथील जागेचे अधिग्रहण करावे, येथील सुशिक्षित व आयटीआय झालेल्या प्रशिक्षित युवकांना अजून प्रशिक्षण देऊन स्थानिक युवकांचा सुरजागड लोहप्रकल्पात भरणा करावा अन्यथा कच्चा माल बाहेर जाऊ देणार नसल्याचे वासेकर यांनी नमूद केले आहे.