शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

वैभव व इतिहासाची साक्ष देणाऱ्या वैरागड येथील किल्ल्याचे खास्तहाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2020 05:00 IST

चंद्रपूरचा गाेंड राजा बाबाजी बल्हाळशहा यांनी वैरागडातील हिऱ्यांच्या खाणीच्या संरक्षणार्थ हा किल्ला बांधला. या किल्ल्यावर माेगलांनी अनेक स्वाऱ्या केल्या. सेनापती युसूफ खान याने शेवटची स्वारी करून किल्ला लुटण्याचा प्रयत्न केला. या लढाईत त्याचे सर्व सैनिक मारल्या गेले. त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ राजा बल्हाळशहा याने याच परिसरात मस्जिद बांधली आहे. बाराव्या शतकातील हाथीगुंफा या शिलालेखात वैरागडचा उल्लेख आहे. हिऱ्याला संस्कृतमध्ये वाज्रागर म्हणतात. वाज्रागरच्या अपभ्रंषावरून वैरागड हे नाव पडले.

ठळक मुद्देगडप्रेेमींमध्ये नाराजी : डागडुजी न झाल्यास वास्तू नष्ट हाेण्याचा आहे धाेका

  प्रदीप बाेडणे लाेकमत न्यूज नेटवर्कवैरागड : प्राचीन काळातील राज वैभवाची साक्ष देणारा वैरागड येथील किल्ला काळाच्या ओघात ढासळत चालला आहे. काही ठिकाणी तर केवळ अवशेष शिल्लक आहेत. किल्ल्याची ही स्थिती बघून पर्यटन व अभ्यासासाठी आलेल्या गडप्रेमींना अश्रु अनावर हाेतात. ऐतिहासिक वारसा असलेल्या वैरागड किल्ल्याची सध्या कमालीची दुरवस्था झाली आहे.  किल्ल्याचे चार बाजुचे बुरूज, तट, झाडाझुडुपांनी वेढले आहेत. शेकडाे वर्षांपासून उन, वारा, पाऊस झेलणाऱ्या तट व बुरूजांची कमालीची दुरवस्था झाली आहे. किल्ल्याच्या मुख्य दरवाजाची मागील पाच वर्षांपासून भारतीय पुरातत्व विभागाकडून दुरूस्ती केली जात आहे. त्यामुळे मुख्य दरवाजाची स्थिती चांगली आहे. मात्र किल्ल्याच्या आतील भागातील राजाचा महल, किल्ला परिसरात असलेली चाैकाेनी, पंचकाेनी, अष्टकाेनी व इतर विविध आकाराच्या विहीरी, भूयार व किल्ल्याबाहेर पडण्यासाठी असलेल्या मागच्या दरवाजाची पूर्णपणे पडझड झाली आहे. काही भिंती काेसळल्याने त्यांचे दगड अस्ताव्यस्त परसले आहेत. किल्ल्याची आत्ताची स्थिती बघून गडप्रेमींबराेबरच सामान्य माणसांचेही मन हेलावल्याशिवाय राहत नाही.

बल्हाळशहाचे हाेते राज्यचंद्रपूरचा गाेंड राजा बाबाजी बल्हाळशहा यांनी वैरागडातील हिऱ्यांच्या खाणीच्या संरक्षणार्थ हा किल्ला बांधला. या किल्ल्यावर माेगलांनी अनेक स्वाऱ्या केल्या. सेनापती युसूफ खान याने शेवटची स्वारी करून किल्ला लुटण्याचा प्रयत्न केला. या लढाईत त्याचे सर्व सैनिक मारल्या गेले. त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ राजा बल्हाळशहा याने याच परिसरात मस्जिद बांधली आहे. बाराव्या शतकातील हाथीगुंफा या शिलालेखात वैरागडचा उल्लेख आहे. हिऱ्याला संस्कृतमध्ये वाज्रागर म्हणतात. वाज्रागरच्या अपभ्रंषावरून वैरागड हे नाव पडले.

०५ वर्षांपूर्वी झाली हाेती डागडुजी 

२०१५-१६ या वर्षात किल्ल्याच्या साैंदर्यीकरणाच्या कामाला पुरातत्व विभागाने सुरूवात केली. जानेवारी २०२० पासून काम पूर्णपणे बंद पडले आहे. या कालावधीत मुख्य प्रवेशद्वाराची दुरूस्ती झाली. जुन्याप्रमाणेच किल्ला दिसावा, यासाठी जुने दगड व नवीन चुना वापरला आहे. 

वैरागड किल्ला व भंडारेश्वर मंदिराच्या दुरूस्तीसाठी दरवर्षी निधी खर्च केला जात आहे. या ठिकाणी पुरातत्व विभागाने कायमस्वरूपी कर्मचाऱ्याची नेमणूक केली आहे. थांबलेले दुरूस्तीचे काम पुन्हा सुरू हाेणार आहे.  के. आर. के. रेड्डी, पुरातत्व अधिकारी

भावी पिढीला जुने वैभव, इतिहास व  कलाकृतींची साक्ष  पटण्यासाठी किल्ला दुरूस्त हाेणे आवश्यक आहे. केवळ थातुरमातुर दुरूस्त करून ऐतिहासिक वास्तुंचे संवर्धन करण्याचा केवळ देखावा केला जात असल्याचे दिसून येते.दत्तात्रेय हर्षे, गडप्रेमी, वैरागड

टॅग्स :Fortगड