काेर्ला-पातागुडम मार्ग रहदारीसाठी ठरताेय अडचणीचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:37 IST2021-04-24T04:37:20+5:302021-04-24T04:37:20+5:30
सिराेंचा : तालुक्यातील अतिदुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काेर्ला परिसरात अद्यापही पक्के रस्ते नसल्याने नागरिकांना पावसाळ्यात रहदारीस अनेक अडचणी ...

काेर्ला-पातागुडम मार्ग रहदारीसाठी ठरताेय अडचणीचा
सिराेंचा : तालुक्यातील अतिदुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काेर्ला परिसरात अद्यापही पक्के रस्ते नसल्याने नागरिकांना पावसाळ्यात रहदारीस अनेक अडचणी येतात. काेर्ला-पातागुडम ह्या ८ किमी रस्त्याचे बांधकाम केल्यास हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग ६३ ला थेट जाेडला जाऊन बारमाही वाहतूक व्यवस्था निर्माण हाेऊ शकते. परंतु नागरिकांच्या मागणीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याने अडचणीच्या मार्गानेच नागरिकांना रहदारी करावी लागत आहे.
सिराेंचा तालुक्यातील काेपेला, पुल्लीगुडम, किष्टय्यापल्ली, काेर्ला, रमेशगुडम, कर्जेली व झिंगानूर तसेच परिसरातील गावे आदिवासीबहुल आहेत. काेर्ला ते पातागुडम हे अंतर ८ किमी आहे. सध्या येथून कच्चा रस्ता आहे. सदर मार्गाचे बांधकाम केल्यास परिसरातील गावांना पातागुडम येथे राष्ट्रीय महामार्गाला थेट जाेडता येते. त्यामुळे नागरिकांसाठी बारमाही वाहतुकीची साेय हाेईल. सध्या या भागात पक्का रस्ता नाही. तसेच रस्त्याअभावी महामंडळाची बसफेरी नाही. तालुका मुख्यालयी जाण्यासाठी खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागताे. परंतु अनेक नागरिकांकडे स्वमालकीची वाहने नसल्याने तालुका मुख्यालयी जाण्यासाठी अडचणी येत आहेत. विविध वस्तू आणण्यासाठी भाड्याची वाहने करावी लागतात. सदर मार्गावर माेठे नाले किंवा नदी नसल्याने पक्का रस्ता झाल्यानंतर वाहतुकीस अडचण येणार नाही. कव्हरेजची समस्या आहे. त्यामुळे शासकीय रुग्णवाहिका सुद्धा येथे येत नाही. गंभीर रुग्णांना रुग्णालयात उपचारार्थ भरती करताना अनेक समस्या जाणवतात. दरवर्षी अधिकारी व लाेकप्रतिनिधी काेर्ला व परिसरातील गावांना भेटी देतात. याप्रसंगी ते केवळ आश्वासन देतात, परंतु मागणी मंजूर करीत नाही. जनजागरण मेळाव्यात पाेलीस अधिकारी कच्च्या रस्त्याची समस्या जाणून घेतात. ही समस्या जिल्हा पाेलीस अधीक्षकांपर्यंत पाेहाेचली आहे, अशी माहिती आहे. दरवर्षी परिसरातील नागरिक श्रमदानातून रस्त्यालगतची झुडपे ताेडून व खड्डे बुजवून रस्ता सपाट करतात. परंतु पावसाळ्यात पुन्हा अवस्था ‘जैसे थे’ हाेते. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून रस्त्याचे बांधकाम करावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून हाेत आहे.
बाॅक्स
पावसाळ्यात तुटताे संपर्क
पावसाळ्यात काेर्ला परिसरातील गावांचा संपर्क तालुका मुख्यालयाशी तुटताे. नवसंजीवनी याेजनेंतर्गत परिसरातील गावांचा समावेश हाेत असल्याने पावसाळ्यातील चार महिन्यांचे स्वस्त धान्य एप्रिल-मे महिन्यातच लाभार्थ्यांना पाेहाेचविले जाते. अतिशय दुर्गम व जंगलव्याप्त भाग असल्याने काेर्ला-पातागुडम रस्त्याचे बांधकाम आवश्यक आहे.
===Photopath===
230421\23gad_7_23042021_30.jpg
===Caption===
श्रमदानातून रस्ता दुरूस्ती करताना काेर्ला परिसरातील नागरिक.