शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

कौन बनेगा खासदार

By admin | Updated: May 15, 2014 23:31 IST

गडचिरोली-चिमूर या अनुसूचित जमाती राखीव मतदार संघाचा दुसरा खासदार होण्याचा मान कुणाला मिळतो याकडे मतदारांचे लक्ष लागले आहे. १0 एप्रिल रोजी १६ व्या लोकसभा ..

गडचिरोली : गडचिरोली-चिमूर या अनुसूचित जमाती राखीव मतदार संघाचा दुसरा खासदार होण्याचा मान कुणाला मिळतो याकडे मतदारांचे लक्ष लागले आहे. १0 एप्रिल रोजी १६ व्या लोकसभा निवडणुकीचे मतदान पार पडल्यानंतर १६ मे रोजी मतमोजणी होऊ घातली आहे. गेले सव्वा महिने विजयाच्या चर्चा रंगल्या. त्यानंतर आता निकालाचा क्षण काही तासांवर येऊन ठेपला आहे. गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदार संघातील मतदारांनी आपला कौल कोणाच्या बाजुने दिला हे मतमोजणीतून स्पष्ट होऊन जाईल.

गडचिरोली-चिमूर या लोकसभा मतदार संघात ११ उमेदवार आपले भाग्य अजमाविण्यासाठी उभे होते. या मतदार संघात ६८.३३ टक्के मतदान झाले. त्यानंतर आता मतमोजणीची तयारी प्रशासनाने पूर्ण केली आहे.

सकाळी ८ वाजतापासून शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात मतमोजणीला सुरूवात होणार आहे. मतमोजणीसाठी आमगाव, आरमोरी, अहेरी, चिमूर या विधानसभा मतदार संघासाठी प्रत्येकी १२ टेबल व गडचिरोली, ब्रम्हपुरी या विधानसभा मतदार संघासाठी प्रत्येकी १४ टेबल असे एकूण ७६ टेबल राहणार आहे. ७६ टेबलावर सरासरी २६ फेरीपर्यंत मतमोजणी होणार आहे. मतमोजणीसाठी ५६0 अधिकारी व कर्मचार्‍यांची नेमणूक करण्यात आली आहे. शासकीय तंत्रनिकेतनच्या दुसर्‍या माळ्यावर आमगाव, आरमोरी, अहेरी, चिमूर तर तिसर्‍या माळ्यावर गडचिरोली, ब्रम्हपुरी विधानसभा मतदार संघाची मतमोजणी होईल. फेरीनिहाय मतमोजणीची आकडेवारी मतमोजणी केंद्रावरून तसेच गोंडवाना विद्यापीठ येथून ध्वनीक्षेपकाद्वारे प्रसारित करण्यात येणार आहे. मतमोजणीच्या ठिकाणी कडक सुरक्षा व्यवस्था राहणार असल्याने मतमोजणी केंद्रात ओळखपत्राशिवाय प्रवेश राहणार नाही.

कोटगल चौकापासून बेरीगेट राहणार असून कोटगल चौक मतमोजणी केंद्राबाहेरील प्रवेशद्वार व मुख्यद्वार, अशा तीन ठिकाणी ओळखपत्राची तपासणी करण्यात येणार आहे. मतमोजणी केंद्रावर भ्रमणध्वनी यंत्र (मोबाईल) व इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे बाळगता येणार नाही. तसेच मतमोजणी केंद्रावर धुम्रपानास बंदी राहील. मतमोजणी कर्मचारी, मतमोजणी प्रतिनिधीच्या वाहनाकरिता पार्कींगची व्यवस्था कारागृहाच्या बाजुला करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी रणजीतकुमार यांनी दिली आहे. मतमोजणी असल्यामुळे कोटगल, इंदाळा, काम्प्लेक्स या भागातील वाहतूक व्यवस्थेतही पोलीस प्रशासनाकडून बदल करण्यात आले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)