शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
3
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
4
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
5
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
6
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
7
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
8
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
9
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
10
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
11
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
12
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
13
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
14
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
15
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
16
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
17
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
18
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
19
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
20
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?

काेराेनाने सात महिन्यात 108 तर यावर्षी साडेतीन महिन्यांत 172 मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 05:00 IST

जिल्ह्यात गेल्यावर्षी मे महिन्यात काेराेनाच्या पहिल्या रूग्णाचा शिरकाव झाला. तेव्हापासून आतापर्यंत १६ हजर ९३६ जणांना काेराेनाची लागण झाली आहे. त्यापैकी १२ हजार ७७३ जणांनी काेराेनावर यशस्वीपणे मात केली. परंतु २८० जणांना प्राण गमवावे लागले. त्यातील अनेक जण लगतच्या चंद्रपूर, गाेंदिया, भंडारा एवढेच नाही तर काही नागपूर जिल्ह्यातील रूग्ण आहेत. काेराेनाच्या दुसऱ्या लाटेत ग्रामीण भागातील रूग्णांचे मृत्यू वाढत आहेत. 

ठळक मुद्देदुसऱ्या लाटेचा ग्रामीण भागातही कहर, ऑक्सिजनयुक्त बेड्सची कमतरता

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : जिल्ह्यात जानेवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यानंतर आलेल्या काेराेनाच्या दुसऱ्या लाटेने गडचिराेली शहरासह ग्रामीण भागातही चांगलाच कहर केला आहे. या साडेतीन महिन्यांत तब्बल १७२ जणांचा काेराेनाने मृत्यू झाला. त्यापैकी अर्धेअधिक लाेक ग्रामीण भागातील आहेत. ग्रामीण स्तरावर सुसज्ज आराेग्य सुविधेची गरज निर्माण झाली असून ती देताना आराेग्य यंत्रणेला कसरत करावी लागत आहे. गडचिराेली शहरात चार ठिकाणी काेरेानाबाधित रुग्णांवर उपचाराची साेय करण्यात आली आहे; परंतु ग्रामीण भागात तालुका मुख्यालयी एकच काेराेना केअर सेंटर आहे. त्यातही ऑक्सिजनयुक्त बेडची साेय माेजक्याच रुग्णालयात आहे. अशावेळी रुग्णाची प्रकृती बिघडल्यास किंवा त्याला तातडीने ऑक्सिजनची गरज भासल्यास जिल्हा मुख्यालयी आणण्याशिवाय पर्याय नसताे. या गडबडीत रुग्णाला जीव गमवावा लागू शकताे. त्यामुळे ग्रामीणस्तरावर आराेग्य सुविधांमध्ये वाढ करून ऑक्सिजनची साेय करण्याची गरज निर्माण झाली आहे. जानेवारी महिन्यापर्यंत जिल्ह्यात सक्रीय रूग्णांची संख्या १ हजार पेक्षा जास्त कधीच नव्हती. पण आताच्या स्थितीत सक्रीय रूग्णांची संख्या ४ हजाराचा पल्ला गाठत आहे. म्हणजेच सात महिन्यात जेवढे रूग्ण हाेते त्यापेक्षा दुप्पट रूग्ण गेल्या तीन महिन्यात वाढले आहेत. ही बाब जिल्हावासीयांसाठी चिंतेची आहे. 

आतापर्यंत २८० जणांनी गमावले प्राणजिल्ह्यात गेल्यावर्षी मे महिन्यात काेराेनाच्या पहिल्या रूग्णाचा शिरकाव झाला. तेव्हापासून आतापर्यंत १६ हजर ९३६ जणांना काेराेनाची लागण झाली आहे. त्यापैकी १२ हजार ७७३ जणांनी काेराेनावर यशस्वीपणे मात केली. परंतु २८० जणांना प्राण गमवावे लागले. त्यातील अनेक जण लगतच्या चंद्रपूर, गाेंदिया, भंडारा एवढेच नाही तर काही नागपूर जिल्ह्यातील रूग्ण आहेत. काेराेनाच्या दुसऱ्या लाटेत ग्रामीण भागातील रूग्णांचे मृत्यू वाढत आहेत. 

ऑक्सिजनसाठी ६० किमीचा प्रवासजिल्ह्याच्या पूर्व टाेकावरील धानाेरा तालुक्यात ऑक्सिजनयुक्त बेड असलेले काेविड केअर सेंटर नाही. त्यामुळे या तालुक्यातील मुरूमगावसह अनेक टाेकावरच्या गावातील रूग्णांना ऑक्सिजनसाठी ६० ते ७० किलाेमीटरचा पल्ला गाठत गडचिराेलीत येण्याशिवाय गत्यंतर नसते. दुर्गम भागातील धानाेरापर्यंत येण्यासाठी वाहनाचीही साेय नसते. तालुक्याला एकच रूग्णवाहिका असल्यामुळे ती कुठे-कुठे पुरणार, असा प्रश्न निर्माण हाेताे. 

माहिती देण्यास अधिकाऱ्यांची टाळाटाळकाेराेना आजारासंदर्भात विविध प्रकारची माहिती जाणून घेण्यााची उत्सुकता नागरिकांमध्ये असते. याशिवाय आपल्या भागातील आराेग्यविषयक साेयीसुविधांची माहिती त्यांना हवी असते. परंतु आराेग्य विभागाचे काही अधिकारी माहिती देण्यास टाळाटाळ करत असल्यामुळे शंकेला वाव निर्माण हाेत आहे. आरमाेरी तालुका आराेग्य अधिकारी डाॅ.आनंद ठिकरे यांनी वरिष्ठांनी (जिल्हा आराेग्य अधिकारी) प्रसार माध्यमांना माहिती न देण्याची सूचना केल्याचे लाेकमतशी बाेलताना सांगितले.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यू