काेराेनाने सात महिन्यात 108 तर यावर्षी साडेतीन महिन्यांत 172 मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 05:00 IST2021-04-23T05:00:00+5:302021-04-23T05:00:28+5:30
जिल्ह्यात गेल्यावर्षी मे महिन्यात काेराेनाच्या पहिल्या रूग्णाचा शिरकाव झाला. तेव्हापासून आतापर्यंत १६ हजर ९३६ जणांना काेराेनाची लागण झाली आहे. त्यापैकी १२ हजार ७७३ जणांनी काेराेनावर यशस्वीपणे मात केली. परंतु २८० जणांना प्राण गमवावे लागले. त्यातील अनेक जण लगतच्या चंद्रपूर, गाेंदिया, भंडारा एवढेच नाही तर काही नागपूर जिल्ह्यातील रूग्ण आहेत. काेराेनाच्या दुसऱ्या लाटेत ग्रामीण भागातील रूग्णांचे मृत्यू वाढत आहेत.

काेराेनाने सात महिन्यात 108 तर यावर्षी साडेतीन महिन्यांत 172 मृत्यू
लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिराेली : जिल्ह्यात जानेवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यानंतर आलेल्या काेराेनाच्या दुसऱ्या लाटेने गडचिराेली शहरासह ग्रामीण भागातही चांगलाच कहर केला आहे. या साडेतीन महिन्यांत तब्बल १७२ जणांचा काेराेनाने मृत्यू झाला. त्यापैकी अर्धेअधिक लाेक ग्रामीण भागातील आहेत.
ग्रामीण स्तरावर सुसज्ज आराेग्य सुविधेची गरज निर्माण झाली असून ती देताना आराेग्य यंत्रणेला कसरत करावी लागत आहे. गडचिराेली शहरात चार ठिकाणी काेरेानाबाधित रुग्णांवर उपचाराची साेय करण्यात आली आहे; परंतु ग्रामीण भागात तालुका मुख्यालयी एकच काेराेना केअर सेंटर आहे. त्यातही ऑक्सिजनयुक्त बेडची साेय माेजक्याच रुग्णालयात आहे. अशावेळी रुग्णाची प्रकृती बिघडल्यास किंवा त्याला तातडीने ऑक्सिजनची गरज भासल्यास जिल्हा मुख्यालयी आणण्याशिवाय पर्याय नसताे. या गडबडीत रुग्णाला जीव गमवावा लागू शकताे. त्यामुळे ग्रामीणस्तरावर आराेग्य सुविधांमध्ये वाढ करून ऑक्सिजनची साेय करण्याची गरज निर्माण झाली आहे.
जानेवारी महिन्यापर्यंत जिल्ह्यात सक्रीय रूग्णांची संख्या १ हजार पेक्षा जास्त कधीच नव्हती. पण आताच्या स्थितीत सक्रीय रूग्णांची संख्या ४ हजाराचा पल्ला गाठत आहे. म्हणजेच सात महिन्यात जेवढे रूग्ण हाेते त्यापेक्षा दुप्पट रूग्ण गेल्या तीन महिन्यात वाढले आहेत. ही बाब जिल्हावासीयांसाठी चिंतेची आहे.
आतापर्यंत २८० जणांनी गमावले प्राण
जिल्ह्यात गेल्यावर्षी मे महिन्यात काेराेनाच्या पहिल्या रूग्णाचा शिरकाव झाला. तेव्हापासून आतापर्यंत १६ हजर ९३६ जणांना काेराेनाची लागण झाली आहे. त्यापैकी १२ हजार ७७३ जणांनी काेराेनावर यशस्वीपणे मात केली. परंतु २८० जणांना प्राण गमवावे लागले. त्यातील अनेक जण लगतच्या चंद्रपूर, गाेंदिया, भंडारा एवढेच नाही तर काही नागपूर जिल्ह्यातील रूग्ण आहेत. काेराेनाच्या दुसऱ्या लाटेत ग्रामीण भागातील रूग्णांचे मृत्यू वाढत आहेत.
ऑक्सिजनसाठी ६० किमीचा प्रवास
जिल्ह्याच्या पूर्व टाेकावरील धानाेरा तालुक्यात ऑक्सिजनयुक्त बेड असलेले काेविड केअर सेंटर नाही. त्यामुळे या तालुक्यातील मुरूमगावसह अनेक टाेकावरच्या गावातील रूग्णांना ऑक्सिजनसाठी ६० ते ७० किलाेमीटरचा पल्ला गाठत गडचिराेलीत येण्याशिवाय गत्यंतर नसते. दुर्गम भागातील धानाेरापर्यंत येण्यासाठी वाहनाचीही साेय नसते. तालुक्याला एकच रूग्णवाहिका असल्यामुळे ती कुठे-कुठे पुरणार, असा प्रश्न निर्माण हाेताे.
माहिती देण्यास अधिकाऱ्यांची टाळाटाळ
काेराेना आजारासंदर्भात विविध प्रकारची माहिती जाणून घेण्यााची उत्सुकता नागरिकांमध्ये असते. याशिवाय आपल्या भागातील आराेग्यविषयक साेयीसुविधांची माहिती त्यांना हवी असते. परंतु आराेग्य विभागाचे काही अधिकारी माहिती देण्यास टाळाटाळ करत असल्यामुळे शंकेला वाव निर्माण हाेत आहे. आरमाेरी तालुका आराेग्य अधिकारी डाॅ.आनंद ठिकरे यांनी वरिष्ठांनी (जिल्हा आराेग्य अधिकारी) प्रसार माध्यमांना माहिती न देण्याची सूचना केल्याचे लाेकमतशी बाेलताना सांगितले.