शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

न्यायदान प्रक्रिया सुरळीत व्हावी

By admin | Updated: January 15, 2017 01:29 IST

कमी वेळेत व कमी खर्चात न्याय मिळणे हा नागरिकांचा हक्क आहे. कुरखेडाच्या या नवनिर्मित इमारतीतून न्यायदानाची प्रक्रिया सुरळीत व्हावी,

भूषण गवई : न्यायालय इमारतीचे उद्घाटन कुरखेडा : कमी वेळेत व कमी खर्चात न्याय मिळणे हा नागरिकांचा हक्क आहे. कुरखेडाच्या या नवनिर्मित इमारतीतून न्यायदानाची प्रक्रिया सुरळीत व्हावी, असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांनी केले. कुरखेडा येथील दिवाणी न्यायालयाच्या नव निर्मित इमारतीचे उद्घाटन शनिवारी न्यायमूर्ती गवई यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे होते. प्रमुख अतिथी म्हणून मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती प्रदीप देशमुख, कुरखेडाचे प्रभारी दिवाणी न्यायाधीश कु. रा. सिंघेल, तालुका वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रमोद बुध्दे आदी मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलताना न्यायमूर्ती गवई म्हणाले, गडचिरोली जिल्ह्याला निसर्गाने भरभरून दिलेले आहे. जिल्ह्यातील ऐतिहासीक व धार्मिक स्थळांचा विकास झाल्यास पर्यटनाला मोठा वाव मिळेल. त्यानंतर गडचिरोली जिल्ह्याला लागलेला मागासलेपणाचा कलंक पुसला जाईल, असे ते म्हणाले. न्यायमूर्ती प्रदीप देशमुख यांनी ज्यासाठी कुरखेडा येथे न्यायालयाच्या नव्या इमारतीचे बांधकाम झाले. तो हेतू साध्य झाला पाहिजे. सकारात्मक मानसिक ठेवून येथील न्यायप्रक्रिया गतीमान करावी, असे आवाहन न्यायमूर्ती देशमुख यांनी केली. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते इमारत बांधकाम केल्या प्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता प्रदीप खवले, कार्यकारी अभियंता बूग, कंत्राटदार कमलेश पटेल, उपविभागीय अभियंता सुनिल मार्लीवार, शाखा अभियंता अजय चहांदे यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच जिल्हा न्यायालय व्यवस्थापक डब्ल्यू. एम. खान यांनी साकारलेल्या गडचिरोली अ‍ॅप व यूजर मॅन्युअल या पुस्तकाचे विमोचन करण्यात आले. संचालन प्रा. डॉ. नरेंद्र आरेकर तर आभार न्यायाधीश सिंघेल यांनी मानले. (तालुका प्रतिनिधी)३०८ खटले प्रलंबित कुरखेडा येथील ०.८० हेक्टर भूखंडावर चार कोटी रूपये खर्च करून न्यायालयाच्या नव्या इमारतीचे बांधकाम करण्यात आले आहे. कुरखेडाच्या न्यायालयात दिवाणी ५२ व फौजदारी २५६ असे एकूण ३०८ खटले प्रलंबित आहेत, अशी माहिती प्रास्ताविकेतून वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रमोद बुध्द यांनी यावेळी दिली.