आदिवासी ठक्कर बाप्पा योजनेत अनियमितता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:36 IST2021-05-14T04:36:00+5:302021-05-14T04:36:00+5:30
ठक्कर बाप्पा योजनेंतर्गत सन २०१८ ते २०२१ या तीन वर्षात कामाच्या मंजूर यादीत सातत्याने विशिष्ट ग्रामपंचायतींनाच झुकते माप देण्यात ...

आदिवासी ठक्कर बाप्पा योजनेत अनियमितता
ठक्कर बाप्पा योजनेंतर्गत सन २०१८ ते २०२१ या तीन वर्षात कामाच्या मंजूर यादीत सातत्याने विशिष्ट ग्रामपंचायतींनाच झुकते माप देण्यात येत आहे, तर दोन तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींना सदर योजनेअंतर्गत मागील काही वर्षांपासून कोणतीच कामे मंजूर करण्यात आलेली नसतानाही, येथील कामांचे प्रस्ताव नाकारण्यात येत आहेत. त्यामुळे विशिष्ट ग्रामपंचायतीत कामांना मंजुरी प्रदान करण्यात अधिकारी-कर्मचारी यांचे हित तर नाही, अशी शंका उपस्थित होत आहे, असेही जयंत हरडे यांनी म्हटले आहे.
बाॅक्स
...तर आंदाेलन करणार
कुरखेडा व काेरची तालुक्यात आदिवासी ठक्कर बाप्पा याेजनेंतर्गत झालेल्या कामांच्या मंजुरीसंदर्भात माहितीसाठी काही सामाजिक कार्यकर्त्यांनी माहितीच्या अधिकारात मागील तीन वर्षांच्या मंजूर कामांचा गोषवारा मागितला आहे. यानंतर कामातील अनियमितता स्पष्ट होणार आहे; मात्र तोपर्यंत यावर्षी मंजूर करण्यात आलेल्या कामांच्या यादीला स्थगिती देण्यात यावी, अशी मागणी जयंत हरडे यांनी केली आहे. अन्यथा सदर प्रकरणात वरिष्ठ अधिकाऱ्यांचेही हात ओले झाले आहेत, असे गृहित धरले जाईल. या प्रकरणातील अनियमिततेच्या चाैकशीसाठी गडचिराेली प्रकल्प कार्यालयासमाेर तीव्र आंदाेलन करण्यात येईल, असा इशारा जयंत हरडे यांनी दिला आहे.