वन तस्कराच्या मृत्यूची चौकशी
By Admin | Updated: May 31, 2014 23:30 IST2014-05-31T23:30:21+5:302014-05-31T23:30:21+5:30
वन कर्मचारी व सागवान तस्कर यांच्या झालेल्या चकमकीत अनमुला आईलन्ना नर्सय्या रा. गंजीरामपेठा हा मृत्यू पावला. याबाबतची दंडाधिकारीय चौकशी करण्यात येत आहे.

वन तस्कराच्या मृत्यूची चौकशी
सिरोंचा : वन कर्मचारी व सागवान तस्कर यांच्या झालेल्या चकमकीत अनमुला आईलन्ना नर्सय्या रा. गंजीरामपेठा हा मृत्यू पावला. याबाबतची दंडाधिकारीय चौकशी करण्यात येत आहे.
सिरोंचा वन विभागाच्या झिंगानूर वनपरिक्षेत्रातील कक्ष क्र. २१0 मध्ये २0 फेब्रुवारी २0१३ रोजी वन कर्मचारी व वन तस्कर यांच्यात झालेल्या चकमकीत अनमुला आईलन्ना नर्सय्या (३0) हा वन तस्कर मृत्यू पावला. सदर हल्ल्यात उपविभागीय वनाधिकारी देवीदास जिद्देवार यांच्यासह बामणीचे वनपरिक्षेत्राधिकारी बालय्या सिरबोईना गंभीर जखमी झाले. याप्रकरणी ज्यांना निवेदन अथवा प्रतिज्ञापत्र सादर करावयाचे आहेत त्यांनी १0 जूनपर्यंत उपविभागीय दंडाधिकारी अहेरी यांच्या कार्यालयात कार्यालयीन वेळेत उपस्थित राहून माहिती सादर करावी. माहिती पुरविणार्याच्या नावाबाबत गुप्तता पाळण्यात येईल, असे कळविण्यात आले आहे.
यापूर्वीही सन २00९ मध्ये सोमनूरजवळील इंद्रावती नदीच्या पात्रात असरअल्लीचे क्षेत्र सहायक दिगांबर बलकी यांनी केलेल्या गोळीबारात सोमनपल्ली येथील तीन वन तस्कर ठार झाले होते. यातील कल्लेम रमेश, जावा सिताराम यांचे मृतदेह आढळून आले. मात्र तिसर्याचा मृतदेह सापडला नाही. या प्रकरणाबाबत बरेच चर्वितचर्वण झाल्यावर तत्कालीन उपविभागीय दंडाधिकारी दामोधर नान्हे यांच्या न्यायालयात चौकशी सुरू झाली. मात्र सदर प्रकरण अजूनही गुलदस्त्यातच आहे. १४ मार्च रोजी वन कर्मचारी व वन तस्करांच्या कथित चकमकीत भोगापूर येथील गोरय्या कोमाटी या ४४ वर्षीय तस्कराचा मृत्यू झाला. अलीकडेच घडलेले हे प्रकरणही गुलदस्त्यात आहे.