सोन्यात करा गुंतवणूक ! प्रत्येक महिन्याला वाढते किंमत, सराफा बाजार तेजीत
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2025 15:11 IST2025-02-10T15:08:20+5:302025-02-10T15:11:53+5:30
Gadchiroli : सोने तारण ठेवून काही वेळातच उपलब्ध होते कर्ज

Invest in gold! The price is increasing every month, the bullion market is booming
विलास चिलबुले
लोकमत न्यूज नेटवर्क
आरमोरी : सोन्याच्या दरात दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे पहायला मिळत आहे. सोन्याच्या दरात होत असलेल्या वाढीमुळे नवनवा उच्चांकी दर गाठला जात आहे. त्यामुळे ग्राहकदेखील सोन्यामध्ये गुंतवणूक करण्यास मागेपुढे पाहत नसल्याचे चित्र आहे.
भारतात सोने-चांदी मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते. प्रत्येक घरात थोडे का होईना पण सोन्याचे दागिने असतात. गरजेच्या वेळी हेच सोन्याचे दागिने गहाण ठेवून किंवा मोडून आर्थिक अडचण दूर करता येते. त्यामुळे सोन्यात गुंतवणूक करण्याला भारतीय प्राधान्य देतात.
आता सोन्याचे भाव प्रतितोळा ८६ हजार रुपये झाले असून, यात गुंतवणूक केली तर भविष्यात १५ टक्के रिटर्न मिळतील, असा अंदाज सराफ बाजाराने व्यक्त केला आहे. १५ टक्के परतावा उद्योग व्यवसायामध्येसुद्धा मिळत नाही. त्यामुळे सोन्यातील गुंतवणूक योग्य मानली जाते. मात्र सोन्यातील गुंतवणूक अचल असल्याने काही गुंतवणूकदार सोन्यामध्ये फारशी गुंतवणूक करीत नसल्याचे दिसून येते.
सोन्यातील गुंतवणूक नेमकी कशासाठी करावी ?
सोन्याची किंमत महागाईप्रमाणे वाढते. बँकेत मिळणारे व्याज आणि चलनवाढ यांचा विचार केल्यास, सोन्यात गुंतवणूक हा एकच गुंतवणूक पर्याय आहे. सोन्यात गुंतवणूक ही सुरक्षित गुंतवणूक आहे.
१५ टक्के भाव वाढले तरी दागिण्यांसाठी खरेदी वाढली
परतावा सोन्याच्या गुंतवणुकीतून उपलब्ध होते. विशेष म्हणजे, सोन्याच्या गुंतवणुकीत फारशी जोखीम नाही. व्यवस्थापनाची जबाबदारी राहत नाही.
पाच वर्षांत रिटर्न किती?
सोन्याने गेल्या पाच वर्षांत तब्बल ११२ टक्क्यांचा परतावा दिला आहे. सध्या लग्नसराईचा काळ सुरू असल्याने सोन्याच्या दागिन्यांची मागणी मोठ्या प्रमाणात २ आहे. इतकेच नाही तर येत्या काही दिवसांत सोन्याचा दर २० हजार रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचण्याचा अंदाज आहे.
पाच वर्षांतील आकडे ?
महिना सोने (प्रति तोळा) चांदी (प्रति किलो)
फेब्रुवारी २०२१ ४६,२६० ६८,९००
फेब्रुवारी २०२२ ५१,२११ ६४,९५०
फेब्रुवारी २०२३ ५६,१७० ६३,०००
फेब्रुवारी २०२४ ६२,८३० ७३,९००
फेब्रुवारी २०२५ ८६,२५० ९८,५००
"सोने दरवाढीचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसला आहे. दरवाढीचा फटका सामान्य कुटुंबातील वधू-वर पक्षांना बसला आहे"
- अंकुश खरवडे, व्यापारी
"सोन्याच्या वाढत्या भावामुळे सराफा व्यवसायात मोठी मंदी झाली आहे. त्यामुळे सरकारने वाढत्या दरवाढीकडे लक्ष देण्याची गरज आहे."
- अक्षय बेहेरे, व्यापारी