नक्षल सप्ताहानिमित्त भामरागडात वाहनांची तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 05:00 IST2021-07-30T05:00:00+5:302021-07-30T05:00:42+5:30
अतिसंवेदनशील भामरागड तालुक्यात उपविभागिय पोलीस अधिकारी डॉ.कुणाल सोनवणे यांनी मुख्य मार्गांवर नाकेबंदी करून बाहेरून येणाऱ्या प्रत्येक वाहनांची तपासणी मोहीम तीव्र केली आहे. ठाणेदार किरण रासकर, पोलीस उपनिरीक्षक मंगेश कराडे, ज्ञानेश्वर भोसले, संघमित्र बांबोळे यांच्यासह जिल्हा पोलीस व सीआरपीएफ जवान तैनात असून, सर्व ती खबरदारी घेतली जात आहे.

नक्षल सप्ताहानिमित्त भामरागडात वाहनांची तपासणी
लाेकमत न्यूज नेटवर्क
भामरागड : नक्षल सप्ताहादरम्यान कुठल्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या आदेशानुसार, पोलीस नक्षल हालचालींवर करडी नजर ठेवून आहेत. अतिसंवेदनशील भामरागड तालुक्यात उपविभागिय पोलीस अधिकारी डॉ.कुणाल सोनवणे यांनी मुख्य मार्गांवर नाकेबंदी करून बाहेरून येणाऱ्या प्रत्येक वाहनांची तपासणी मोहीम तीव्र केली आहे.
ठाणेदार किरण रासकर, पोलीस उपनिरीक्षक मंगेश कराडे, ज्ञानेश्वर भोसले, संघमित्र बांबोळे यांच्यासह जिल्हा पोलीस व सीआरपीएफ जवान तैनात असून, सर्व ती खबरदारी घेतली जात आहे.
नक्षल सप्ताहामुळे कामे प्रभावित होणार नाही आणि नक्षलींचा उद्देश यशस्वी होणार नाही याकडे कटाक्षाने लक्ष दिले जात आहे. त्यामुळे एसटी महामंडळाच्या बसेस आणि सार्वजनिक व्यवहारही बऱ्याच प्रमाणात सुरू आहेत.
धानाेरा, काेरची तालुक्यात बंद
- नक्षल सप्ताहानिमित्त धानाेरा तालुक्यातील मुरूमगाव हा छत्तीसगड सीमेकडील भाग काहीसा दहशतीत आहे. त्यामुळे या भागातील मार्केट आणि शेतीची कामे बंद झाली आहेत. मुरूमगाव परिसरातील ११ गावात पाेलाेचे आयाेजन केले आहे.
- काेरची तालुक्यातही नक्षल बंदचा प्रभाव जाणवत आहे. अनेक गावांमधील व्यवहार बंद असून वाहतूकही सुरू नसल्याचे दिसून येते.