तपासणी नाक्याचा भार रोजंदारी कर्मचाऱ्यांवर

By Admin | Updated: August 28, 2014 23:47 IST2014-08-28T23:47:11+5:302014-08-28T23:47:11+5:30

वनरक्षक, वनपाल यांच्या २५ आॅगस्टपासून सुरू असलेल्या आंदोलनाचा परिणाम आष्टी, मार्र्कंडा (कं.)सह जिल्हाभरातील वनतपासणी नाक्यावर झाला आहे. वनपरिक्षेत्र मार्र्कंडा (कं.) चौडमपल्ली

Inspection nose load on wage earners | तपासणी नाक्याचा भार रोजंदारी कर्मचाऱ्यांवर

तपासणी नाक्याचा भार रोजंदारी कर्मचाऱ्यांवर

आष्टी : वनरक्षक, वनपाल यांच्या २५ आॅगस्टपासून सुरू असलेल्या आंदोलनाचा परिणाम आष्टी, मार्र्कंडा (कं.)सह जिल्हाभरातील वनतपासणी नाक्यावर झाला आहे. वनपरिक्षेत्र मार्र्कंडा (कं.) चौडमपल्ली येथील वनकर्मचारी आंदोलनावर गेल्याने रोजंदारीवरील कर्मचाऱ्यांमार्फत तपसाणी नाके चालविले जात आहेत. त्यामुळे वनपरिक्षेत्राधिकाऱ्यांची दमछाक होत आहे.
आष्टी व मार्र्कंडा (कं.) येथील तपासणी नाका तीन दिवसांपासून रोजंदारी तत्वावरील कर्मचारी सांभाळत आहेत. त्यामुळे या विभागातील कामावर परिणाम होत आहे. मार्र्कंडा वनपरिक्षेत्र कार्यालयांतर्गत येत असलेल्या आष्टी येथील तपासणी नाक्यावर एकही वनरक्षक कामावर नाही. त्यामुळे या नाक्यावर रोजंदारी कर्मचारी दीपक बिश्वास हे काम पाहत आहेत. या तपासणी नाक्यावर दिवसभर बांबू, लठ्ठे आदी माल भरून ट्रक जात असतात. या प्रत्येक वाहनांची नोंद नाक्यावर केली जाते. परंतु सद्य:स्थितीत तपासणी नाक्यावर वनकर्मचारी कार्यरत नसल्याने रजिस्टरवर वाहनांची नोंद करीत असताना नवीन कर्मचाऱ्यांचे चांगलीच दमछाक होत आहे. प्रसंगी या कर्मचाऱ्यांमध्ये धांदलही उडत आहे. वनपरिक्षेत्राधिकारी शेखर तनपुरे हे तीन दिवसांपासून परिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या वनक्षेत्रात फिरत आहेत. त्यामुळे वनपरिक्षेत्राधिकाऱ्यांची चांगलीच कसरत होत आहे. चौडमपल्ली वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या मार्र्कंडा (कं.) येथील नाक्यावर दोन रोजंदारी कर्मचारी काम पाहत आहेत. विशेष म्हणजे, या रोजंदारी कर्मचाऱ्यांना मार्च महिन्यांपासूनच वेतन देण्यात आले नसून ते वेतनापासून वंचित आहेत. चौडमपल्लीचे वनपरिक्षेत्राधिकारी बडोदे व वनपाल ठाकरे, गोडबोले हे तीन दिवसांपासून त्यांच्या क्षेत्रातील परिसरात फिरत आहेत. मार्र्कंडा वनक्षेत्रातील २१ वनरक्षक, ३ वनपाल, ६ वनमजूर तर चौडमपल्लीतील १० वनरक्षक, ३ वनपाल व ४ वनमजूर संपावर आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Inspection nose load on wage earners

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.