Injured in raid attack | रानडुकराच्या हल्ल्यात इसम जखमी

रानडुकराच्या हल्ल्यात इसम जखमी

ठळक मुद्देचांभार्डातील घटना : गडचिरोली रूग्णालयात उपचार सुरू

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : सकाळी शेताकडे जात असलेल्या इसमावर रानटी डुकराने हल्ला करून त्याला गंभीर जखमी केल्याची घटना सोमवारी चांभार्डा येथे घडली.
माधोजी भगवान शेडमाके (६५) असे जखमी इसमाचे नाव आहे. शेडमाके हे नेहमीप्रमाणे पहाटेला गावाबाहेरच्या शेताकडे गेले असता, कळपातील एका रानटी डुकराने त्यांच्यावर हल्ला चढविला. त्यामुळे ते खाली कोसळले. त्यानंतर पुन्हा दोन वेळा डुकराने त्यांना उचलून खाली आपटले. यात त्यांना ६-७ ठिकाणी जखम झाल्या. सकाळी लगेच त्यांना अमिर्झा प्राथमिक आरोग्य केंद्रात भरती करण्यात आले. परंतु गंभीर अवस्था लक्षात घेऊन त्यांना गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ भरती करण्यात आले. सदर माहिती मिळताच पोर्लाचे वनपरिक्षेत्र अधिकारी एम. पी. चांगले यांच्या मार्गदर्शनात वनपाल के. पी. अंबादे, वनरक्षक एम.जी. कोटांगले, नामदेव मुनघाटे यांनी पंचनामा केला.
चांभार्डा परिसरात डुकरांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली आहे. या डुकरांकडून शेतीचेही मोठे नुकसान होत आहे. वन विभाग मात्र या डुकरांना मारू देत नाही व स्वत: सुध्दा कोणताही उपाय करीत नाही. डुकरांच्या त्रासामुळे अनेक शेतकऱ्यांनी रबीतील पिके घेणे बंद केले असल्याचे दिसून येत आहे.

Web Title: Injured in raid attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.