काँग्रेसतर्फे महागाईचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2018 23:41 IST2018-02-03T23:41:01+5:302018-02-03T23:41:37+5:30
भाजपप्रणित केंद्र शासनाकडून दररोज पेट्रोल व डिझेलचे दर वाढविले जात आहेत. याचा फटका सर्वसामान्य वाहनधारकांना बसत आहे. पेट्रोल, डिझेल दरवाढीच्या विरोधात तालुका काँग्रेस कमिटी चामोर्शीच्या वतीने बुधवारी येथील चौकात निषेध करण्यात आला.

काँग्रेसतर्फे महागाईचा निषेध
लोकमत न्यूज नेटवर्क
चामोर्शी : भाजपप्रणित केंद्र शासनाकडून दररोज पेट्रोल व डिझेलचे दर वाढविले जात आहेत. याचा फटका सर्वसामान्य वाहनधारकांना बसत आहे. पेट्रोल, डिझेल दरवाढीच्या विरोधात तालुका काँग्रेस कमिटी चामोर्शीच्या वतीने बुधवारी येथील चौकात निषेध करण्यात आला.
यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष निशांत नैताम, नगरपंचायतीचे उपाध्यक्ष राहूल नैताम, पदाधिकारी सुरेश भांडेकर, नगरसेवक सुमित तुरे, यशवंत निकोडे, विनोद खोबे, शंकर दास, संजय धोडरे, राकेश सोमनकर, लोकेश शातलवार, सतीश सोमनकर, अंकूश नैताम, पप्पू गौरकार, भिकन सातपुते, चंद्रकांत नैताम, विशाल शिंदे, उज्वल डंबारे, अविनाश चौधरी यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी काँग्रेसच्या पदाधिकाºयांनी केंद्र शासनाच्या धोरणाविरोधात तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली.