गेल्या वर्षभरापासून देशात काेराेनाने थैमान घातले आहे. संपूर्ण देश हतबल झालेला आहे. अशा कठीण प्रसंगी केवळ डाॅक्टर आणि नर्स आपल्या जीवाची बाजी लावून अहाेरात्र रुग्णांची सेवा करून मानवजातीच्या कल्याणाचे काम करीत आहेत. कंत्राटी नर्सेसना शासनाकडून अत्यंत तूटपुंजे मानधन मिळत आहे. हे चिंतनीय असून, माेठी शाेकांतिका आहे. शासनाने एनआरएचएमअंतर्गत असलेल्या परिचारिकांना मासिक ४० हजार रुपये मानधन द्यावे, अशी मागणी केली आहे. सीएचओला जेवढा पगार दिला जाताे तेवढा परिचारिकांना का नाही? त्यांच्या कार्यावर समाज व देश उभा आहे, त्यांचीच पिळवणूक का? असा प्रश्न निर्माण हाेत आहे. शासनाने या सर्व गाेष्टींचा विचार करून कंत्राटी नर्सेसना सीएचओइतके वेतन द्यावे, अशी मागणी डाॅ. साळवे यांनी केली आहे.
परिचारिकांचे कार्य लक्षात घेऊन त्यांचे मानधन वाढवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:37 IST