घारगावजवळील पुलांची उंची वाढवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:36 IST2021-04-08T04:36:53+5:302021-04-08T04:36:53+5:30

चामाेर्शी तालुक्यातील भेंडाळा परिसरात असलेल्या घारगावजवळील नाल्यावर कमी उंचीचा पूल आहे. तसेच संरक्षण भिंतीअभावी गाळामुळे नाला भुईसपाट झाला आहे. ...

Increase the height of bridges near Ghargaon | घारगावजवळील पुलांची उंची वाढवा

घारगावजवळील पुलांची उंची वाढवा

चामाेर्शी तालुक्यातील भेंडाळा परिसरात असलेल्या घारगावजवळील नाल्यावर कमी उंचीचा पूल आहे. तसेच संरक्षण भिंतीअभावी गाळामुळे नाला भुईसपाट झाला आहे. हरणघाट, घारगाव, रामाळा, फराडा व मार्कंडादेव असा ८ किलोमीटरचा प्रस्तावित राज्य मार्ग मंजूर करून या रस्त्याचे काम तसेच पुलावर संरक्षण भिंत नसल्याने मोठ्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. नाला गाळाने तुडुंब भरला आहे. त्यामुळे पाणी वहन गती मंदावली आहे. नाल्यातील भाग सपाट झाला आहे. त्यामुळे नाल्यातील गाळ उपसा व खोलीकरण करण्याची गरज आहे. पावसाळ्यात नाल्याशेजारी असलेल्या शेत जमिनीत पाणी साचून पिके करपून जातात. याचा फटका शेतकऱ्यांना दरवर्षी बसताे. नाल्याशेजारी असलेल्या जमिनी पूरग्रस्त भाग म्हणून महसूल दप्तरी नोंद आहे. पावसाळ्यात नाल्यावर भरपूर प्रमाणात पाणी असते. त्यामुळे फेरा मारून मार्कंडादेव येथे जावे लागते. याचा त्रास नागरिकांना हाेताे. त्यामुळे या मार्गावर असलेल्या घारगावजवळील नाल्याची उंची व मजबुतीकरण करावे; तसेच हरणघाट ते मार्कंडादेव बायपास रस्त्याकरिता निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य कविता भगत यांनी राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

Web Title: Increase the height of bridges near Ghargaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.