शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
3
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
4
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
5
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
6
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
7
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
8
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
9
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
10
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
11
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
12
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
13
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
14
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
15
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
16
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
17
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
18
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
19
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
20
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
Daily Top 2Weekly Top 5

एसटीला पावणे दोन कोटींचे उत्पन्न

By admin | Updated: October 13, 2016 02:41 IST

राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक मासिक पास योजना राबविली जाते.

पाच महिन्यांत : जिल्ह्यातील हजारो पासधारक विद्यार्थ्यांचा प्रवासगडचिरोली : राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक मासिक पास योजना राबविली जाते. यामध्ये विद्यार्थ्यांना शासनाकडून ६६.६० टक्के सवलत मिळते. एप्रिल ते आॅगस्ट २०१६ या पाच महिन्यांच्या कालावधीत राज्य परिवहन महामंडळाच्या गडचिरोली विभागाला विद्यार्थी पासमधून १ कोटी ७५ लाख १७ हजार रूपयांचे उत्पन्न मिळाले आहे. आपल्या स्वगावावरून शाळा असलेल्या बाहेरगावी ये-जा करण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाने प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक तसेच वरिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी मासिक पास योजना सुरू केली आहे. तसेच व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या माध्यमिक, उच्च माध्यमिक व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी ही योजना कार्यान्वित केली आहे. २०१६ च्या एप्रिल महिन्यात एकूण ३ हजार ८४ विद्यार्थ्यांनी एसटी प्रवास केला. यातून गडचिरोलीच्या एसटी विभागाला ४ लाख ६५० रूपयांचे उत्पन्न मिळाले. यामध्ये ३३.३४ टक्क्यानुसार १ लाख ३३ हजार ५५० रूपये विद्यार्थ्यांनी अदा केले. तर ६६.६६ टक्क्यानुसार राज्य शासनाकडून २ लाख ६७ हजार १०० रूपयांचे उत्पन्न मिळाले. व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या एकूण ५४१ विद्यार्थ्यांनी एप्रिल महिन्यात प्रवास केला. यातून एकूण ५ लाख ८५ हजार ९३० रूपयांचे उत्पन्न गडचिरोली विभागाला मिळाले. यात १ लाख ९५ हजार ३१० रूपये संबंधित पासधारक विद्यार्थ्याने एसटीला अदा केले. तर ३ लाख ९० हजार ६२० रूपये शासनाने परिवहन महामंडळाला दिले आहेत. मे महिन्यात २८ हजार ४४० रूपये बिगर व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडून मिळाले. तर व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडून ५ लाख ६८ हजार २६० रूपयांचे उत्पन्न मिळाले. जून महिन्यात बिगर व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडून ४ लाख ६१ हजार ८२० तर व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडून ३ लाख ८९ हजार ७०० रूपयांचे उत्पन्न मिळाले. जुलै महिन्यात बिगर व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या पासधारक विद्यार्थ्यांकडून ५७ लाख ७६ हजार ८०० तर व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडून ५ लाख ३७ हजार ९६० रूपयांचे उत्पन्न एसटीला मिळाले. आॅगस्ट महिन्यात ७८ लाख ४१ हजार तर व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडून ९ लाख २६ हजार रूपयांचे उत्पन्न मिळाले. (प्रतिनिधी)६६.६६ टक्के सवलतीची रक्कम शासनाकडून अदाविद्यार्थ्यांना बाहेरगावी जाऊन महाविद्यालयीन तसेच व्यावसायिक शिक्षण घेणे सोयीचे व्हावे, यासाठी राज्य परिहवन महामंडळाने विद्यार्थ्यांसाठी पास सवलत दिली आहे. पासधारक विद्यार्थ्यांना शासनाकडून ६६.६६ टक्के सवलत मिळते. विद्यार्थ्यांना ३३.३४ टक्क्यानुसार संबंधित अंतराच्या प्रवासाचे पैसे महामंडळाला अदा करावे लागतात. राज्य शासन विद्यार्थ्यांच्या बस प्रवासाच्या सवलतीची जबाबदारी घेत असते. मात्र महामंडळाला यापोटी द्यावयाची कोट्यवधीची रक्कम शासनाकडे प्रलंबित असल्याची माहिती आहे.