शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
5
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
6
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
7
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
8
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
9
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
10
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
11
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
12
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
13
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
14
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
15
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
16
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
17
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
18
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
19
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
20
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
Daily Top 2Weekly Top 5

बाल क्रीडा महोत्सवाचे थाटात उद्घाटन

By admin | Updated: January 20, 2016 02:52 IST

केंद्र शासनाने कौशल्य विकास उपक्रम सुरू केला आहे. या अंतर्गत देशभरात मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी

कुरखेडा : केंद्र शासनाने कौशल्य विकास उपक्रम सुरू केला आहे. या अंतर्गत देशभरात मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. परदेशातून गुंतवणूकही होणार असून उद्योगधंद्यांना भरभराटी येणार आहे. प्रत्येक वर्षाला किमान ५० लाख सुशिक्षीतांना नोकऱ्या उपलब्ध होईल. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनीही आतापासूनच या दृष्टीने दर्जात्मक शिक्षण मिळविण्यासाठी परिश्रम करावेत, असे प्रतिपादन खासदार अशोक नेते यांनी केले. कुरखेडा येथे जिल्हास्तरीय शालेय बालक्रीडा महोत्सव व कर्मचाऱ्यांच्या सांस्कृतिक व क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. या स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष परशुराम कुत्तरमारे यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार अशोक नेते होते.या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून आमदार डॉ. देवराव होळी, महाराष्ट्र राज्याचे शिक्षण आयुक्त डॉ. पुरूषोत्तम भापकर, जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी संपदा मेहता, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष जीवन नाट, बांधकाम व नियोजन सभापती अतुल गण्यारपवार, कृषी व पशुसंवर्धन सभापती अजय कंकडालवार, समाज कल्याण सभापती विश्वास भोवते, पं.स. सभापती शामीना उईके, उपसभापती बबन बुध्दे, कुरखेडाचे नगराध्यक्ष महेंद्र मोहबंशी, उपस्थित होते. या कार्यक्रमाला जि.प. सदस्य अशोक इंदूरकर, निरांजनी चंदेल, पद्माकर मानकर, लंकेश भोयर, अ‍ॅड. गजानन दुगा, सरीता वाटगुरे, पुनम गुरनुले, मनोहर पोरेटी, नागेश शानगोंडा, उपसभापती होमराज बुध्दे, जयश्री धाबेकर, प्रभाकर तुलावी, चांगदेव फाये, महादेव नाकाडे, तुळशीराम बोगा, नेहा नंदेश्वर, कविता दडमल, गीता धाबेकर, इंदिरा पुराम, आशा तुलावी, चित्रा गजभिये, शाहेदा मुगल, उसमान खान, रामहरी उगले, सोनू भट्टड, नागेश फाये, अ‍ॅड. उमेश वालदे, बबलू हुसैनी, रवींद्र गोटेफोडे, मनोज सिडाम, अनिता बोरकर, नंदीनी दखणे, दिपाली देशमुख, स्वाती नंदनवार आदी उपस्थित होते. क्रीडा मशाल प्रज्वलीत करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष परशुराम कुत्तरमारे यांनी खेळामुळे विद्यार्थ्यांचा शारीरिक, बौध्दिक व मानसिक विकास होतो. विद्यार्थ्यांमध्ये अभिरूची, आत्मविश्वास, चिकाटी, जिज्ञासू वृत्ती व मैत्रीचे वातावरण या गुणांची वाढ करून चांगले खेळाडू निर्माण करण्यासाठी प्रयत्न करा. सरकारने खेळांडूना नोकरी देण्याचे ठरविले आहे. त्यामुळे दर्जेदार खेळाडू तयार झाले पाहिजे, असे प्रतिपादन केले. शिक्षण आयुक्त डॉ. पुरूषोत्तम भापकर यांनी शिक्षकांना समाजात मानाचा स्थान आहे. शिक्षकांनी आपली भूमिका योग्यरितीने पार पाडली पाहिजे. सुसंस्कारीत सुशिक्षीत गुणवाण पिढी निर्माण करण्याची जबाबदारी शिक्षकांवर आहे, असे प्रतिपादन केले. प्रास्ताविक शिक्षणाधिकारी (प्राथमिक) माणिक साखरे यांनी केले. संचालन राजू वडपल्लीवार, आभार शिक्षणाधिकारी (निरंतर) निलेश पाटील यांनी मानले. बाराही तालुक्यातून खेळाडू या स्पर्धेसाठी कुरखेडा येथे दाखल झाले आहे. (तालुका प्रतिनिधी)