शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
2
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
3
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
4
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
5
जर्मनीत अंतराळवीरांना १०० दिवसांचा एकांतवास! त्यांनी काही मोठा गुन्हा केला आहे का?
6
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
7
बापरे, हा काय प्रकार! हाय हिल्स घालून अक्षय कुमारचा 'लालपरी' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल
8
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
9
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
10
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
11
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
12
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
13
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
14
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
15
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
16
जांभळाला सोन्याचा भाव, किरकोळमध्ये ५०० रुपये किलो; ३०० ते ४०० रुपयांचा घाऊक बाजारात भाव
17
९० वर्षीय वृद्धेच्या मानहानी दाव्यावर थेट २० वर्षांनी २०४६ मध्ये सुनावणी; हायकोर्टात काय घडलं?
18
नेदरलँडवरून कुरियरने विनाअडथळा उल्हासनगरमध्ये पोहोचले पार्टी ड्रग्ज; नायजेरियन टोळीचे कनेक्शन
19
ठाण्यातील १०० एकरच्या TDR ला अखेर स्थगिती, सुप्रीम कोर्टाचा निर्णय; २,८०० कोटींचा व्यवहार रखडला
20
दुसऱ्या संधीच्या सीईटीसाठी ९ ते २१ मे दरम्यान परीक्षा; ४ लाख ९२ हजार विद्यार्थी परीक्षेला बसणार
Daily Top 2Weekly Top 5

अपुऱ्या तिकीट यंत्रांनी बिघडवले एसटी बसेसचे वेळापत्रक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2021 05:00 IST

लाेखंडी ट्रेमधून तिकीट काढून त्यावर पंच करून तिकीट देणारा वाहक बहुतांश प्रवाशांना परिचयाचा आहे. मात्र आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत एसटी महामंडळानेही ती जुनी पद्धत बंद करून पाच वर्षांपूर्वी तिकीट काढण्यासाठी ईटीआय हे छोटेखानी यंत्र वाहकांच्या हाती दिले. या यंत्राने वाहकांचे कामकाज बरेच साेपे केले. सातत्याने या मशीनचा वापर करण्यामुळे जुन्या पद्धतीने ट्रेमधील तिकीट देण्याची वाहकांची सवय तुटली. 

ठळक मुद्दे४० टक्के यंत्रांचा तुटवडा; ‘ईटीआय’च्या प्रतीक्षेमुळे प्रवाशांना फटका

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : गडचिराेली एसटी आगारातील एसटीच्या वाहकांकडे आवश्यकतेच्या तुलनेत ६० टक्केच तिकीट यंत्रे उपलब्ध आहेत. त्यामुळे दुसरी  बस आगारात येऊन हे यंत्र उपलब्ध हाेईपर्यंत वाहकाला प्रतीक्षा करावी लागते. परिणामी बसला विलंब हाेऊन प्रवाशांचा वेळ खर्ची होत आहे.लाेखंडी ट्रेमधून तिकीट काढून त्यावर पंच करून तिकीट देणारा वाहक बहुतांश प्रवाशांना परिचयाचा आहे. मात्र आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत एसटी महामंडळानेही ती जुनी पद्धत बंद करून पाच वर्षांपूर्वी तिकीट काढण्यासाठी ईटीआय हे छोटेखानी यंत्र वाहकांच्या हाती दिले. या यंत्राने वाहकांचे कामकाज बरेच साेपे केले. सातत्याने या मशीनचा वापर करण्यामुळे जुन्या पद्धतीने ट्रेमधील तिकीट देण्याची वाहकांची सवय तुटली. जेवढ्या एसटी बसेस आहेत त्यापेेक्षा जास्त प्रमाणात मशीन उपलब्ध असणे आवश्यक आहे. मात्र गडचिराेली आगारात  बसगाड्यांपेक्षा कमी प्रमाणात मशीन उपलब्ध आहेत. गडचिराेली आगारात १०३ बसेस आहेत. त्यासाठी १५० यंत्रांची आवश्यकता आहे, मात्र प्रत्यक्षात केवळ ८० यंत्रे उपलब्ध आहेत. जुन्या वाहकांना ट्रेमधील साधे तिकीट देण्याचे काैशल्य अवगत आहे. नवीन वाहकांना या तिकिटांचा हिशेब समजत नाही. परिणामी ते साधे तिकीट साेबत नेण्यास नकार देतात. दुसऱ्या बसमधील तिकीट यंत्र उपलब्ध होईपर्यंत प्रतीक्षा करतात. ताेपर्यंत बसला उशीर हाेतो. बसच्या वेळेवर प्रवासी स्थानकात पाेहाेचून प्रतीक्षा करत उभे राहतात. पण बस वेळेवर साेडली जात नाही. याचा त्रास प्रवाशांना हाेत आहे. कंटाळून काही प्रवासी बसऐवजी दुसऱ्या खासगी वाहनाचा आधार घेऊन प्रवास करतात. 

अनेक यंत्रे नागपूर व मुंबईत पडूनईटीआय यंत्र दुरुस्त करण्याचे कंत्राट एका खासगी कंपनीला देण्यात आले आहे. या कंपनीने आगारात एक तंत्रज्ञ बसविला आहे. हा तंत्रज्ञ किरकाेळ  बिघाड दुरुस्त करतो. मात्र माेठा बिघाड असल्यास यंत्र नागपूर किंवा मुंबई येथे पाठविले जातात. त्याची तक्रारही ऑनलाइन करावी लागते. गडचिराेली आगारातून आतापर्यंत १२२ ऑनलाइन तक्रारी नाेंदविण्यात आल्या आहेत; पण अजून ती यंत्रे दुरुस्त करून परत करण्यात आलेली नाहीत. 

तिकीट यंत्र बंद पडण्याचे प्रमाण वाढले डिजिटल तिकीट यंत्रात कधीही बिघाड निर्माण हाेण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंत्र असले तरी तिकिटांचा ट्रे साेबत ठेवावाच लागतो. गडचिराेली आगारात असलेल्या बहुतांश यंत्रांना आता पाच वर्षांपेक्षा अधिक कालावधी झाला आहे. त्यामुळे त्यांची कार्यक्षमता कमी हाेऊन त्यांच्यात बिघाड निर्माण हाेण्याचे प्रमाण वाढले असल्याने वाहक त्रस्त झाले आहेत. मात्र नाेकरी करायची असल्याने हा वैताग त्यांना सहन करावा लागणार आहे, अशी प्रतिक्रिया अनेक वाहकांनी दिली.  

टॅग्स :state transportएसटी