तुमची मुलं खेळात चांगले तर मग ऑनलाइन नोंदणी केली का ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2025 17:10 IST2025-05-15T17:08:13+5:302025-05-15T17:10:10+5:30

बहुतांश शाळांचा कानाडोळा : विविध विभागांमार्फत क्रीडा स्पर्धांचे आयोजन

If your children are good at sports, did you register them online? | तुमची मुलं खेळात चांगले तर मग ऑनलाइन नोंदणी केली का ?

If your children are good at sports, did you register them online?

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली :
जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमधूनही होतकरू खेळाडू पुढे आलेले आहे. यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्याची गरज असते. जि.प. शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या खेळाडू विद्यार्थ्यांच्या नावाची नोंदणी शिक्षकांमार्फत क्रीडा विभागाकडे करावी लागते. विद्यार्थ्यांमध्ये क्रीडागुण असतील, तर त्याची नोंदणी शाळांनी करावी.


क्रीडा विभागांतर्गत शालेय क्रीडा स्पर्धा स्कूल फेडरेशनच्या वतीने आयोजित केल्या जातात. याशिवाय जिल्हा परिषदेच्या वतीने शालेय क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या जातात. केंद्र, तालुका, जिल्हा, विभागस्तरावर या स्पर्धा होतात. याशिवाय आदिवासी विकास विभाग, समाजकल्याण विभागाच्या वतीने क्रीडा स्पर्धा घेतल्या जातात. केवळ स्कूल फेडरेशन अंतर्गत घेतल्या जाणाऱ्या स्पर्धामध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंचीच नोंदणी क्रीडा विभागाकडे होत असल्याचे दिसून येते. बहुतांश शाळा याकडे कानाडोळा करतात. 


शाळांनी ऑनलाइन नोंदणी करणे आवश्यक
खेळाडू असलेल्या शाळांनी क्रीडा विभागाकडे खेळाडूची नोंदणी करणे आवश्यक आहे. परंतु, बहुतांश शाळा यास बगल देतात. नोंदणी करीत नाही. 


शालेय खेळाडूंसाठी ५० क्रीडा प्रकार
शालेय खेळाडूंसाठी क्रिकेट, हॉकी, फुटबॉल, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, कबड्डी, खो-खो, बॅडमिंटन, टेनिस, स्क्वॉश, ग्राऊंड क्रिकेट, लॉन टेनिस, कराटे, ज्युडो, कुस्ती, सायकलिंग, धाव, आदी खेळात प्रावीण्य असलेला खेळाडू नोंदणी करू शकतो.


नोंदणी कधी करायची ?
जुलै महिन्यांपासून जिल्ह्यात काही शाळांमार्फत ही नोंदणी केली जाते. जवळपास सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यापर्यंत ही नोंदणी करता येते. यासाठी संबंधित शाळांनी काळजी घेण्याची गरज आहे. अन्यथा होतकरू खेळाडू विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याशिवाय राहत नाही.


"जिल्हा परिषद शाळांमधून उत्कृष्ट खेळाडू निर्माण व्हावेत यासाठी शाळांनी नोंदणी करणे आवश्यक आहे. तेव्हाच होतकरू खेळाडूंना संधी मिळेल. क्रीडा विभागाकडून नेहमीच यासाठी सहकार्य केले जाते."
- भास्कर घटाळे, जिल्हा क्रीडा अधिकारी

Web Title: If your children are good at sports, did you register them online?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.