शहरं
Join us  
Trending Stories
1
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
2
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
3
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
4
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
5
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
6
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
7
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
8
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
9
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
10
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
11
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
12
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
13
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
14
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
15
कुस्तीपटू बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई; ‘नाडा’ने अंधारात ठेवल्याचा कुस्ती महासंघाचा आरोप
16
भारत पाकिस्तानविरुद्ध ६ ऑक्टोबरला भिडणार
17
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत
18
विक्रमी धावसंख्येसह कोलकाता विजयी; नरेनचा निर्णायक अष्टपैलू खेळ; लखनौचा ९८ धावांनी उडवला धुव्वा 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

सालगड्याचे भाव पाेहाेचले आता लाखाच्या घरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 5:00 AM

शेतीसोबत जनावरे शेतकरी पाळत असतात. त्याची देखभाल करण्यासाठी शेतकरी दरवर्षी सालगडी मजूर वर्षभरासाठी ठेवत असतात. पूर्वी सालगडी मजूर सहज मिळत होते. मात्र, बदलत्या काळानुसार सालगडी मजूर म्हणून काम करण्यासाठी मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. अशातच दरवर्षी सालगडी मजुरांच्या मजुरीचे दर वाढत चालले आहेत. त्यामुळे वर्षभर शेतीची देखभाल कशी करावी, हा प्रश्न  सधन शेतकऱ्यांना पडला आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांची चिंता वाढली

रोशन थोरातलाेकमत न्यूज नेटवर्कभेंडाळा : तालुक्यात मोठ्या प्रमाणात शेतजमीन आहे.  या शेतजमिनीची देखभाल करण्यासाठी सालगडी मजूर ठेवण्याची प्रथा गेल्या कित्येक दशकापासून सुरू आहे. मात्र, दिवसेंदिवस सालगडी मजूर मिळणे कठीण झाले असून सध्या सालगडी मजुरांचे भाव लाखाच्या घरात पोहोचले आहेत. शेतीसोबत जनावरे शेतकरी पाळत असतात. त्याची देखभाल करण्यासाठी शेतकरी दरवर्षी सालगडी मजूर वर्षभरासाठी ठेवत असतात. पूर्वी सालगडी मजूर सहज मिळत होते. मात्र, बदलत्या काळानुसार सालगडी मजूर म्हणून काम करण्यासाठी मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. अशातच दरवर्षी सालगडी मजुरांच्या मजुरीचे दर वाढत चालले आहेत. त्यामुळे वर्षभर शेतीची देखभाल कशी करावी, हा प्रश्न  सधन शेतकऱ्यांना पडला आहे. सालगडी मजुरांचे वर्षे गुढीपाडव्याला सुरू होत असते. गुढीपाडवा चार-पाच दिवसांवर येऊन ठेपला असतानासुद्धा सालगडी मजूर पक्के झाले नाहीत. त्यामुळे सधन शेतकरी जुन्या सालगडी मजुरांची मनधरणी करीत आहेत. विशेषतः सालगडी मजूर घराचे काम, मुला-मुलींचे लग्न व इतर कामासाठी किमान सहा महिन्यांची मजुरी एकत्र मागत असतात. कालानुरूप शेतातील कामे आता ठेका पद्धतीने मजुरांकडून केली जात आहेत तसेच जनावरे पाळणे मजुराअभावी कठीण होत चालले आहे. काही सालगडी मजूर परजिल्ह्यांत सालगडी म्हणून राहण्यासाठी जात आहेत. तसेच आता सालगडी मजूर म्हणून काम करण्यास कुणीही पुढे धजत नाही. त्याऐवजी आता सालगडी मजूर म्हणून काम करणारे हंगामी स्वरूपात काम करण्यासाठी परजिल्ह्यांत जात आहेत. त्यातून अधिक पैसे कमावित आहेत तसेच काही सालगडी मजूर घर बांधकाम करताना दिसून येत आहेत. जनावरांची संख्या कमी होत चालली असून प्रत्येक गावात केवळ बोटावर मोजण्याइतपत गुराखी शिल्लक राहिले आहेत. गुराखी शेळ्या, मेंढ्या, गाय, म्हैस, आदी राखण करीत असतात. गुराख्याच्या जनावरांना चरावयाला मोकळी जागा उपलब्ध नसल्याने गुराखी ठेवावा लागताे.

गुढीपाडव्यापासून हाेते खांदेपालटसालगडी वर्षे गुढीपाडव्याला सुरू होते व काही सालगडी खांदेपालट करीत असतात. त्यामुळे गुढीपाडव्याला सालगडी मजुरांचे नवीन साल सुरू होत असते. याला मांडवस असेही ग्रामीण भागात म्हणतात. जनावरे राखण करण्यासाठी गुराखी ठेवण्याची परंपरा गुढीपाडव्यापासून होत असते. 

जनावरांच्या देखभालीसाठी गुराखी मिळेनाजनावरांची संख्या कमी होत चालली असून प्रत्येक गावात केवळ बोटावर मोजण्याइतपत गुराखी शिल्लक राहिले आहेत. गुराखी शेळ्या, मेंढ्या, गाय, म्हैस, आदी राखण करीत असतात. गुराख्यांच्या जनावरांना चरावयाला मोकळी जागा उपलब्ध नसल्याने गुराखी नेहमीच शेतकऱ्यांशी शाब्दिक भांडण करीत असतात त्यामुळे बऱ्याच गावातील गुराखी या कामापासून अलिप्त राहण्यास पसंत करीत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना दुधाळ जनावरे पाळणे कठीण होत चालले तसेच जनावरांची दरमहा राखण वाढत चालली असल्याने बरेच शेतकरी जनावरे विकून टाकत आहेत. केवळ चार महिन्यांचा अपवाद वगळता वर्षभर जनावरांना चराई करण्यासाठी कठीण होत आहे.

 

टॅग्स :Farmerशेतकरी