झाेपेतच पत्नीचा गळा चिरून केला खून; आरोपी पती फरार, गडचिरोलीतील धक्कादायक घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2024 21:52 IST2024-10-24T21:52:24+5:302024-10-24T21:52:24+5:30
काेटा पाेचमपल्लीतील घटना

झाेपेतच पत्नीचा गळा चिरून केला खून; आरोपी पती फरार, गडचिरोलीतील धक्कादायक घटना
गाेपाल लाजूरकर
सिराेंचा (गडचिराेली) : पत्नी झाेपेत असतानाच पतीने धारदार शस्त्राने तिचा गळा चिरून खून केला. ही घटना तालुक्याच्या काेटा पाेचमपल्ली येथे बुधवार, २३ ऑक्टाेबर राेजी मध्यरात्री घडली. या प्रकरणातील आराेपी पती मात्र फरार आहे.
पद्मा समय्या बोल्ले (३५) असे मृत महिलेचे नाव आहे. तर समय्या मुथया बोल्ले (४०) रा. कोटा पोचमपल्ली, असे आराेपीचे नाव आहे. पद्मा व समय्या यांच्यात काही दिवसांपासून भांडण हाेत हाेते. विविध कारणांवरून त्यांच्यात खटके उडत हाेते. भांडणाचे नेमके कारण काय, पाेलिसांना अद्यापही कळू शकले नाही, प्रथमदर्शनी पती- पत्नीमध्ये घरगुती कारणावरून भांडण हाेत असल्याची माहिती मिळाली. याच कारणावरून बुधवारच्या रात्री पती समय्याने कोणत्यातरी धारदार शस्त्राने पद्माच्या गळ्यावर वार करून तिची हत्या केली व ताे घटनास्थळावरून पसार झाला. या घटनेची तक्रार नातेवाईकांनी पाेलिसांत दिली त्यानुसार आराेपीविराेधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आराेपीला पकडल्यानंतरच खुनाचे नेमके कारण स्पष्ट हाेईल, असे तपासी अधिकाऱ्यांनी सांगितले.