शहरं
Join us  
Trending Stories
1
"पेट्रोल-डिझेल वाचवा... 'वर्क फ्रॉम होम' पुन्हा सुरू करा!"; असं का म्हणताहेत पंतप्रधान मोदी? सोनं खरेदी न करण्याचंही आवाहन
2
"इराणचं हसणं आता कायमचं बंद होईल"; ट्रम्प यांचा थेट इशारा; ओबामांनी विमानाने पैसे दिल्याचा आरोप
3
RCB साठी जीव तोडून खेळला; मग MI च्या जखमेवर फुंकर घालत क्रुणाल म्हणाला, "तो काळ माझ्यासाठी…"
4
"आपल्याकडे परिस्थिती नियंत्रणात पण..."; मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं इंधन आणि गॅस बचतीचं आवाहन
5
IPL 2026 : ट्विस्टवर ट्विस्ट! शेवटच्या चेंडूवर RCB नं जिंकली मॅच; MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT
6
"...त्यामुळे, माझ्यासोबत येणंच उत्तम!"; पंतप्रधान मोदींची तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना खास ऑफर; बघा नेमकं काय घडलं?
7
पुणे-नाशिक महामार्ग सलग दुसऱ्या दिवशी 'जाम'; लग्नसराई आणि विकेंडमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल
8
"चर्चा म्हणजे शरणागती नाही!" इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला थेट इशारा; मोज्तबा खामेनीही अ‍ॅक्शन मोडमध्ये!
9
कुटुंबासाठी धोकादायक ठरू शकतात 'या' ५ लोकप्रिय कार! क्रॅश टेस्टमध्ये केवळ ० ते १ रेटिंग; तुमची कार सुरक्षित आहे का?
10
"...तर ममता बॅनर्जी यांना जेलमध्ये जावे लागेल!" बंगाल पराभवानंतर का भडकले TMC चे निलंबित नेते रिजू दत्ता? साधला थेट निशाणा
11
उर्विल पटेलची विक्रमी खेळी! अशक्यप्राय लक्ष्याचा पाठलाग करत CSK नं LSG ला स्पर्धेबाहेर काढलं
12
IPL All Time Records : कमालीचा योगायोग! विराट-रोहितनं एकाच सामन्यात केली धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
13
मातृदिनाचा दिवस काळरात्र ठरला! रील बनवण्याच्या नादात काळजाचे चार तुकडे हरपले; अमरावतीत शोककळा
14
Travel : मे महिन्याच्या उन्हात मिळेल डिसेंबरसारखी थंडी! 'या' ५ ठिकाणांना भेट देऊन सुट्टी करा कूल
15
सुवेंदू अधिकारी नसते तर ५,००० कार्यकर्त्यांची हत्या झाली असती; ममतांच्या प्रवक्त्याचा खळबळजनक दावा
16
शेअर मार्केट, बँक बॅलेन्स २१३ कोटी, १०० कोटींच्या FD...! CM विजय यांची संपत्ती आहे तरी किती? असा आहे गुंतवणुकीचा 'फंडा'
17
"बाबा, ही खेळी तुमच्यासाठी..." १३ चेंडूतील विक्रमी फिफ्टीनंतर उर्विल पटेलचं भावूक सेलिब्रेशन
18
पाकिस्तान हादरलं! आत्मघातकी कार बॉम्बस्फोटात १६ जवानांचा मृत्यू; १०० हून अधिक दहशतवाद्यांचा भीषण हल्ला
19
ऑपरेशन सिंदूरचा वचपा काढण्यासाठी पाकिस्तानची नवी चाल; बहावलपूरमध्ये दहशतवाद्यांचा अड्डा पुन्हा उभा!
20
RCB vs MI : दीपक चाहरचा कहर! 'गोल्डन डक'सह किंग कोहलीवर ओढावली 'ही' नामुष्की
Daily Top 2Weekly Top 5

शौचालयांवर दीड कोटी खर्च

By admin | Updated: September 17, 2016 01:41 IST

स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) अंतर्गत गडचिरोली नगर पालिका प्रशासनाला शासनाने ३ हजार २०५ शौचालय बांधण्याचे उद्दिष्ट दिले.

९०७ शौचालये पूर्ण : गडचिरोली शहराची गोदरीमुक्तीकडे वाटचाल; पालिका प्रशासनाचा पुढाकार
गडचिरोली : स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) अंतर्गत गडचिरोली नगर पालिका प्रशासनाला शासनाने ३ हजार २०५ शौचालय बांधण्याचे उद्दिष्ट दिले. यापैकी पालिका प्रशासनाने ९०७ शौचालयाचे काम पूर्ण केले असून १ हजार ५८६ लाभार्थ्यांना पहिला हप्ता व १ हजार ३७० लाभार्थ्यांना दुसऱ्या हप्त्याचे अनुदान अदा केले आहे. शहरात शौचालय बांधकाम प्राधान्याने करण्यात येत असल्याने गडचिरोली शहराची गोदरीमुक्तीकडे वाटचाल सुरू असल्याचे दिसून येते.
नगर पालिका प्रशासनाच्या वतीने गडचिरोली शहरात जुलै २०१५ पासून शौचालय निर्मितीचे काम हाती घेण्यात आले. शौचालय योजनेच्या अंमलबजावणीसाठी पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी शहरातील सर्वच २३ वार्डात फिरून किती कुटुंबधारकांकडे शौचालये आहेत, किती कुटुंबाकडे शौचालय नाही, याबाबतचे सर्वेक्षण केले. त्यानंतर शौचालय नसणाऱ्या कुटुंबधारकांना नगर पालिकेत अर्ज दाखल करण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले. आतापर्यंत पालिका प्रशासनाने शहरातून २ हजार ८७ लाभार्थ्यांचे अर्ज प्राप्त झाले. यापैकी काही लाभार्थ्यांकडे त्रुट्या आढळून आल्याने त्यांचे अर्ज प्रलंबित ठेवण्यात आले आहेत. १ हजार ५८६ लाभार्थ्यांना शौचालयाचे बांधकाम सुरू करण्यासाठी अग्रीम स्वरूपात पहिल्या हप्त्याच्या अनुदानाची रक्कम अदा करण्यात आली. १ हजार ३७० लाभार्थ्यांना दुसऱ्या हप्त्याच्या अनुदानाची रक्कम अदा करण्यात आली. तसेच प्रत्यक्ष पाहणीत शहरातील ९०७ लाभार्थ्यांनी शौचालयाचे काम पूर्ण केल्याचे आढळून आले. त्यांचे छायाचित्र प्राप्त झाल्यानंतर या लाभार्थ्यांना शेवटच्या तिसऱ्या हप्त्याच्या अनुदानाची रक्कम पालिका प्रशासनातर्फे अदा करण्यात आली.
पालिकेला शौचालय योजनेच्या अंमलबजावणीसाठी केंद्र व राज्य शासनाकडून पहिल्या टप्प्यात १ कोटी २ लाख ७८ हजार, दुसऱ्या टप्प्यात २८ लाख ६८ हजार व तिसऱ्या टप्प्यात ६० लाख असे एकूण १ कोटी ९१ लाख ४६ हजार रूपयांचा निधी प्राप्त झाला. यापैकी पालिकेने आतापर्यंत वैयक्तिक शौचालयाच्या कामांवर १ कोटी ६७ लाख ४६ हजार रूपयांचा खर्च केला आहे. खर्चाअंती पालिका प्रशासनाकडे आता शौचालयाच्या योजनेचा २४ लाख रूपये निधी शिल्लक आहे. शौचालय बांधकामाचा दर आठवड्याला आढावा घेतला जात आहे. (स्थानिक प्रतिनिधी)

अर्ज करण्यास जानेवारीपर्यंत मुदतवाढ
३१ मार्च २०१७ पर्यंत पालिका प्रशासनाच्या वतीने शहरातील ज्या कुटुंबधारकांकडे शौचालय नाहीत, त्या सर्व कुटुंबांना शौचालय योजनेचा लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे. शौचालय नसलेल्या अनेक कुटुंबांनी पालिकेकडे अर्ज केले नाहीत. त्यामुळे पालिका प्रशासनाच्या वतीने जानेवारी २०१६ पर्यंत अर्ज करण्यास मुदतवाढ दिली आहे. शहरातील एकही कुटुंब शौचालयाविना राहू नये, या दृष्टीने पालिका प्रशासनाचे प्रयत्न असून प्रशासनाच्या वतीने शासनाकडे गरज पडल्यास आणखी निधीची मागणी करण्यात येणार आहे, अशी माहिती पालिकेच्या सूत्रांकडून मिळाली आहे.