अशाने डेल्टा प्लसला कसे राेखणार, दाेन्ही डाेज घेणारे केवळ चार टक्के !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 05:00 IST2021-07-02T05:00:00+5:302021-07-02T05:00:26+5:30
काेराेनाची दुसरी लाट संपण्याच्या मार्गावर आहे. डिसेंबर महिन्यामध्ये दुसरी लाट येईल, अशी शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. लाट राेखण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण हाेणे हाच प्रभावी उपाय मानला जातो. त्यादृष्टीने आराेग्य विभाग प्रयत्नरत आहे. पुरेशा प्रमाणात लस उपलब्ध हाेत आहे. मात्र लस घेणाऱ्यांचे प्रमाण कमी आहे.

अशाने डेल्टा प्लसला कसे राेखणार, दाेन्ही डाेज घेणारे केवळ चार टक्के !
लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिराेली : काेराेनाचा नवीन व्हेरिअंट असलेल्या डेल्टा प्लसचे देशात रुग्ण वाढत आहेत. काेराेना प्रतिबंधात्मक लसचे दाेन्ही डाेज घेणे हा या विषाणूवरील प्रभावी उपाय मानला जात असला तरी जिल्ह्यातील केवळ ४ टक्केच नागरिकांनी दाेन्ही डाेज घेतले आहेत. अशा स्थितीत डेल्टा प्लसचे संक्रमण कसे राेखणार, असा प्रश्न उपस्थित हाेत आहे.
काेराेनाची दुसरी लाट संपण्याच्या मार्गावर आहे. डिसेंबर महिन्यामध्ये दुसरी लाट येईल, अशी शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. लाट राेखण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण हाेणे हाच प्रभावी उपाय मानला जातो. त्यादृष्टीने आराेग्य विभाग प्रयत्नरत आहे. पुरेशा प्रमाणात लस उपलब्ध हाेत आहे. मात्र लस घेणाऱ्यांचे प्रमाण कमी आहे.
१८ ते ४४ वयाेगटाचे ५ टक्के लसीकरण
१८ ते ४४ या वयाेगटासाठी एक महिन्यापूर्वी लसीकरण सुरू करण्यात आले हाेते. काही दिवस लसीकरणात खंड पडला हाेता. या वयाेगटातील ६७ हजार ९३० नागरिकांनी पहिला डाेज, तर २ हजार ८८९ नागरिकांना दाेन्ही डाेज देण्यात आले आहेत. याच वर्गाकडून लसीकरणाला सर्वाधिक प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे.
कालावधी वाढविल्याने संख्या घटली
गडचिराेली जिल्ह्याला सर्वाधिक काेविशिल्ड या लसीचा पुरवठा केला जात आहे. सुरुवातीला दाेन डाेजमधील अंतर ४५ दिवसांचे असल्याचे सांगण्यात येत हाेते. मात्र त्यानंतर हा कालावधी ८४ दिवसांचा करण्यात आला आहे. १८ ते ४४ या वयाेगटातील ज्यांनी लस घेतली त्यांचा ८४ दिवसांचा कालावधी झाला नसल्याने लस घेण्याचे प्रमाण घटले आहे.