आशा, गटप्रवर्तकांच्या मानधनात वाढ करा

By Admin | Updated: August 30, 2014 01:28 IST2014-08-30T01:28:24+5:302014-08-30T01:28:24+5:30

जिल्ह्यातील खेड्यासह दुर्गम भागात बालमृत्यू, मातामृत्यू कमी करण्यात महत्वाची भूमिका बजाविणाऱ्या आशा वर्कर व गटप्रवर्तकांना अत्यल्प मानधन दिले जात आहे.

Hope, increase the mentality of group promoters | आशा, गटप्रवर्तकांच्या मानधनात वाढ करा

आशा, गटप्रवर्तकांच्या मानधनात वाढ करा

गडचिरोली : जिल्ह्यातील खेड्यासह दुर्गम भागात बालमृत्यू, मातामृत्यू कमी करण्यात महत्वाची भूमिका बजाविणाऱ्या आशा वर्कर व गटप्रवर्तकांना अत्यल्प मानधन दिले जात आहे. परिणामी या कर्मचाऱ्यांवर वेठबिगारीचे जीवन जगण्याची वेळ आली आहे. त्यामुळे आशा वर्कर व गटप्रवर्तकांच्या वेतनात वाढ करून इतर समस्या त्वरित सोडवाव्यात, अशी मागणी आयटकच्यावतीने खासदार अशोक नेते यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.
दिलेल्या निवेदनात आशा वर्करला १० हजार रूपये गटप्रवर्तकांना १५ हजार रूपये प्रतिमाह मानधन देण्यात यावे, अंगणवाडी सहाय्यक, आरोग्यसेविका या पदावर आशा वर्करला नियुक्ती द्यावी व वयोमर्यादेत शिथीलता द्यावी, आशा वर्कर कर्मचाऱ्यांना वर्षाला १७ हजार २०० रूपयांचा मेहनताना मिळावा, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानातील मार्गदर्शक सुचनांची अंमलबजावणी करावी, जननी सुरक्षा योजनेचा लाभ गरोदर मातांना देण्यात यावा, यात आशा कर्मचाऱ्यांनाही मोबदला द्यावा, आशांकडून अतिरिक्त काम मोबदल्याशिवाय करवून घेणे बंद करावे, गटप्रवर्तकांना शासकीय क व ड श्रेणीतील भरतीत प्राधान्य द्यावे व वयोमर्यादेत शिथीलता द्यावी, गटप्रवर्तकांच्या व्हीजीट भेटमध्ये १५० रूपये वाढ करून ६०० रूपये करण्यात यावे, रेकॉर्ड ठेवण्यासाठी आशांना कपाट द्यावे, आशा व गटप्रवर्तक महिलांना आरोग्य विमा योजना, जनश्री विमा योजनेचा मोफत लाभ द्यावा, आयसीडीएसप्रमाणे आशांना दरमहा मानधन द्यावे, सर्व आशांना वर्षातून दोन युनिफार्म व ओळखपत्र देण्यात यावे, प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रात आशा, गटप्रवर्तकांसाठी स्वतंत्र खोलीची व्यवस्था करावी, दरमहा ३० रूपये मोबाईल बिल भत्ता देण्यात यावा, दिवाळी बोनस द्यावे, आदी मागण्यांचा समावेश आहे. निवेदन देतांना जिल्हा संघटक विनोद झोडगे, देवराव चवळे, रजनी गेडाम, जयमाला सोरते, भाग्यश्री तिवाडे, प्रतीभा सोनुले, सरिता चुधरी, लक्ष्मी सिडाम उपस्थित होत्या. (प्रतिनिधी)

Web Title: Hope, increase the mentality of group promoters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.