विद्यापीठतर्फे क्रांतिकारकांच्या कार्याला उजाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2021 05:00 AM2021-10-23T05:00:00+5:302021-10-23T05:00:34+5:30

बैठकीच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. श्रीनिवास वरखेडी होते. विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेमाची भावना निर्माण व्हावी, जातपात धर्म यापलिकडे जाऊन देशाप्रति एकोप्याची भावना निर्माण व्हावी ,यासाठी अमृत महोत्सवानिमित्त विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना, विद्यार्थी विकास, शारीरिक शिक्षण विभाग तसेच इतर पदव्युत्तर शैक्षणिक विभागाच्या वतीने विद्यापीठामध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे, असे कुलगुरु प्रा. वरखेडी यांनी सांगीतले. 

Highlight the work of revolutionaries on behalf of the university | विद्यापीठतर्फे क्रांतिकारकांच्या कार्याला उजाळा

विद्यापीठतर्फे क्रांतिकारकांच्या कार्याला उजाळा

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : स्थानिक गोंडवाना विद्यापीठात आझादी का अमृत महोत्सव या संदर्भात कार्यक्रमाची आखणी करण्याविषयी विद्यापीठातील विभाग प्रमुख व प्राध्यापक यांच्या बैठकीचे आयोजन नुकतेच विद्यापीठ सभागृहात करण्यात आले होते. याप्रसंगी आझादी का अमृत महोत्सवादरम्यान विविध कार्यक्रमाचे नियाेजन करण्यात आले असून यातून विद्यापीठ प्रशासनातर्फे क्रांतिकारकांच्या कार्यकर्तृत्वाला उजाळा देण्यात येणार आहे.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. श्रीनिवास वरखेडी होते. विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेमाची भावना निर्माण व्हावी, जातपात धर्म यापलिकडे जाऊन देशाप्रति एकोप्याची भावना निर्माण व्हावी ,यासाठी अमृत महोत्सवानिमित्त विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना, विद्यार्थी विकास, शारीरिक शिक्षण विभाग तसेच इतर पदव्युत्तर शैक्षणिक विभागाच्या वतीने विद्यापीठामध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे, असे कुलगुरु प्रा. वरखेडी यांनी सांगीतले. 
देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी हौतात्म्य पत्करले. चिमूर येथील क्रांती भूमीची त्यांनी विशेत्वाने आठवण केली. हा इतिहास विद्यार्थ्यांना माहीत व्हावा. विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेमाची भावना रूजावी यासाठी आझादी का अमृत महोत्सवाचे औचित्य साधून इतिहास विभागाच्यावतीने क्रांतिकारकांच्या विषयावर चर्चासत्र,  राष्ट्रीय सेवा योजना आणि विद्यार्थी विकास विभागाच्यावतीने राष्ट्रगीतावर आधारीत सांस्कृतिक कार्यक्रम, शारीरिक शिक्षण विभागाच्यावतीने सायकल रॅली अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. 
बैठकीला विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. अनिल चिताडे, नव उपक्रम, नवसंशोधन व साहचर्य विभागाचे संचालक डॉ. मनीष उत्तरवार, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. सुरेश रेवतकर, क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागाचे संचालक डॉ.अनिता लोखंडे, ज्ञानस्त्रोत केंद्राचे  संचालक डॉ. नंदकिशोर मोतेवार आदी हजर  हाेते.

Web Title: Highlight the work of revolutionaries on behalf of the university

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app