आरमोरीचा गणेश उत्सव झाला हायटेक
By Admin | Updated: August 30, 2014 01:27 IST2014-08-30T01:27:48+5:302014-08-30T01:27:48+5:30
आरमोरी शहरातील मागील दोन वर्षाचे गणेश, शारदा व दुर्गा उत्सव यंदा संगणकावर आॅनलाईन भाविकांना पाहाता येण्याची सोय झाली आहे. त्यामुळे उत्सवालाही आता हायटेक स्वरूप आले आहे.

आरमोरीचा गणेश उत्सव झाला हायटेक
आरमोरी : आरमोरी शहरातील मागील दोन वर्षाचे गणेश, शारदा व दुर्गा उत्सव यंदा संगणकावर आॅनलाईन भाविकांना पाहाता येण्याची सोय झाली आहे. त्यामुळे उत्सवालाही आता हायटेक स्वरूप आले आहे.
आजच्या संगणकीय युगात आपल्याला सर्वच माहिती इंटरनेटच्या माध्यमातून सहज उपलब्ध होते. मोठ्या शहरातील कोणतेही उत्सव आपण इंटरनेटच्या माध्यमातून घरबसल्या सहज बघू शकतो, अशी व्यवस्था झाली आहे. आरमोरी शहरातील विठ्ठल मंदिर वार्ड, शिवाजी वार्ड, पटेल चौक, राम मंदिर वार्ड, टिळक चौक, ताडूरवार चौक, भगतसिंग चौक, बाजार टोली, सीताबर्डी या सर्व वार्डातील गणपती उत्सवाचे चित्रीकरण युट्युबवर किंवा गुगलवर ‘आरमोरी गणपती उत्सव’ असे सर्च केल्यास सन २०१२ ते २०१३ या वर्षाचे गणेश उत्सवाचे सर्व चित्रीकरण पाहता येणार आहे. तसेच ‘आरमोरी दुर्गा उत्सव’ असे सर्च केल्यास २०१२ व २०१३ या वर्षाचे संपूर्ण शहरातील दुर्गा उत्सव व शारदा उत्सव आपल्याला बघायला मिळतील तसेच शहरातील दहीहंडी उत्सव सुद्धा आपण पाहू शकतो . सन २०१४ चे गणपती व दुर्गा उत्सवाचे चित्रीकरण करून युट्युबवर टाकण्याची तयारी सुरू आहे. या सर्व सोयीमुळे आपल्या भागातील जे नागरिक बाहेर देशात आहेत, तसेच दुसऱ्या राज्यात आहेत आणि ते या उत्सवाला येवू शकत नाही त्याना घर बसल्या आपल्या भागातील उत्सव पाहाता येतील. (प्रतिनिधी)