शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
3
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
4
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
5
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
6
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
7
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
8
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
9
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
10
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
11
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
12
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
13
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
14
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
15
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
16
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
17
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
18
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
19
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
20
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा

येथे किराणा दुकान अन् पानठेल्यांवर विकले जाते पेट्रोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2018 12:29 IST

गडचिरोली जिल्ह्यातील मुलचेरा तालुक्यात पेट्रोल किंवा डिझेलची खुलेआम विक्री चक्क किराणा दुकान आणि पानठेल्यांमधून होत असताना कुणावरही कारवाई होत नाही.

ठळक मुद्देपेट्रोल पंपच नसलेल्या एकमेव मुलचेरा तालुक्यात अशीही सोय

मनोज ताजने।लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : अतिज्वलनशील पदार्थ असणाऱ्या पेट्रोल किंवा डिझेलची विक्री पंपाबाहेर केली जात असेल तर तो गंभीर गुन्हा ठरतो. मात्र गडचिरोली जिल्ह्यातील मुलचेरा तालुक्यात पेट्रोल किंवा डिझेलची अशी खुलेआम विक्री चक्क किराणा दुकान आणि पानठेल्यांमधून होत असताना कुणावरही कारवाई होत नाही. त्यामुळे ज्वलनशील पदार्थ विक्रीसाठी असलेले नियम या तालुक्याला लागू होत नाही काय? असा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही.‘लोकमत’ने केलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये मुलचेरा शहरासह ग्रामीण भागात अनेक ठिकाणी पेट्रोल-डिझेलची खुली विक्री होत असल्याची बाब स्पष्ट झाली आहे. ६८ गावांच्या मुलचेरा तालुक्यात एकही पेट्रोल-डिझेल पंप नाही हे विशेष. अशी स्थिती असलेला महाराष्ट्रातील हा एकमेव तालुका असावा.१५ आॅगस्ट १९९२ रोजी निर्माण झालेल्या या तालुक्यात गॅस एजन्सी, राष्ट्रयकृत बँकही आहे. तालुका म्हणून इतरही सरकारी कार्यालये आहेत. शेकडो चारचाकी वाहने व ट्रॅक्टर तथा हजारो दुचाकी वाहनधारक आहेत. मात्र त्यांच्यासाठी दररोज लागणारे शेकडो लिटर पेट्रोल-डिझेल चक्क चिल्लर विक्रीतून पुरविले जाते. त्यासाठी डिझेलच्या मोठ्या डबक्या काही दुकानांमध्ये भरून ठेवल्या जातात. त्यातून पाईपने छोट्या डबकीत डिझेल काढून ते वाहनात भरले जाते.याच पद्धतीने पेट्रोलही पाण्याच्या एक लिटर बॉटलमधून उपलब्ध केले जाते. काही ठिकाणी पेट्रोलच्या एक-एक लिटरच्या बॉटल भरूनच ठेवलेल्या असतात. ग्राहकाने पेट्रोल मागितले की खालून एक बॉटल काढून दिली जाते. पेट्रोल गाडीत ओतल्यानंतर ती बॉटल पुन्हा दुकानदाराला परत द्यावी लागते.काही ठिकाणी पेट्रोल साठवणुकीच्या कारवाईतून वाचण्यासाठी दुकानासमोर पेट्रोलने भरलेली मोटारसायकल उभी केली जाते. ग्राहकाने पेट्रोल मागितल्यानंतर मोटारसायकलमधून बॉटलमध्ये पेट्रोल काढून ते ग्राहकाच्या गाडीत टाकले जाते. अशा प्रकारच्या खुल्या विक्रीमुळे पेट्रोल-डिझेलमध्ये रॉकेलची भेसळही होते. मात्र दुसरा पर्याय नसल्यामुळे वाहनधारक त्याबद्दल कोणतीही कुरबूर करताना दिसत नाही.

दूर जाणे परवडणारे नाहीपंपावरूनच पेट्रोल किंवा डिझेल घेण्याचे वाहनधारकाने ठरविले तर सर्वात जवळचे ठिकाण आष्टी (२० किमी), आलापल्ली (३५ किमी) किंवा एटापल्लीला (३५ किमी) जावे लागते. ते परवडणारे नसल्यामुळे जास्त रक्कम देऊन वाहनधारक गावातूनच खरेदी करतात.पेट्रोल-डिझेलची खुली विक्री करणे धोकादायकच आहे. पेट्रोलियम अ‍ॅक्टअंतर्गत तहसीलदार किंवा पोलीस अशी विक्री, साठा करणाऱ्यावर कारवाई करू शकतात. मात्र लोकांची सोय होत असल्यामुळे कुणी त्याविरुद्ध तक्रारही करत नाही.पेट्रोलचा दर १०० रुपयेपंपावरील पेट्रोलचा दर आता ९० च्या घरात गेला असला तरी मुलचेरा तालुक्यात काही महिन्यांपासून पेट्रोल १०० रुपये दराने विकले जात आहे. पंपावरील दरापेक्षा १० रुपये जास्त दर असा अलिखित नियमच या तालुक्यात लागू आहे. त्यामुळे वाहनधारकही मुकाट्याने एका लिटरसाठी १०० ची नोट काढून देतात.- एस.पी. खलाते, प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी, गडचिरोली

टॅग्स :Petrolपेट्रोल