नक्षल बंदमुळे अडकलेल्यांना मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2019 06:00 IST2019-12-04T06:00:00+5:302019-12-04T06:00:46+5:30
नक्षलवाद्यांनी पीएलजीए सप्ताहाचे औचित्य साधून १ डिसेंबरच्या रात्री काही ठिकाणी झाडे तोडून ठेवली होती. नक्षल सप्ताहाच्या कालावधीत नक्षल्यांकडून हिंसक घटना घडवून आणल्या जातात. त्यामुळे दुर्गम भागात बसफेºया पाठविल्या जात नाही. याची माहिती दुर्गम भागातील नागरिकांना राहत नाही.

नक्षल बंदमुळे अडकलेल्यांना मदत
लोकमत न्यूज नेटवर्क
धानोरा : नक्षलवाद्यांनी २ डिसेंबरपासून पीएलजीए सप्ताहानिमित्त पुकारलेल्या बंदमुळे दुर्गम भागात जाणाऱ्या काही बसफेºया रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे सोमवारी कामासाठी धानोरा येथे आलेले नागरिक धानोरा येथेच अडकले. ही बाब सीआरपीएफ ११३ बटालियनचे कमांडंट जी. डी. पंढरीनाथ यांना माहित झाल्यानंतर त्यांनी या सर्व प्रवाशांना सीआरपीएफ कॅम्पमध्ये आणून त्यांचे जेवन व वैद्यकीय उपचाराची व्यवस्था केली.
नक्षलवाद्यांनी पीएलजीए सप्ताहाचे औचित्य साधून १ डिसेंबरच्या रात्री काही ठिकाणी झाडे तोडून ठेवली होती. नक्षल सप्ताहाच्या कालावधीत नक्षल्यांकडून हिंसक घटना घडवून आणल्या जातात. त्यामुळे दुर्गम भागात बसफेºया पाठविल्या जात नाही. याची माहिती दुर्गम भागातील नागरिकांना राहत नाही.
मालेवाडा परिसरातील काही नागरिक धानोरा व चातगाव येथे आले होते. मात्र मालेवाडाकडे जाणारी बसफेरी रद्द करण्यात आली. तसेच खासगी वाहनेही बंद होती. परिणामी या परिसरातील जवळपास १० नागरिक धानोरा येथेच अडकले.
धानोरा येथे त्यांचा कोणताही नातेवाईक नसल्याने जेवन व राहण्याची अडचण निर्माण झाली. त्यातच चांदवना गावातील बंबलेश्वरी सोनार ही गर्भवती माता सर्च येथे तपासणीसाठी आली होती. सोबत काही नागरिक सुध्दा होते. या सर्व नागरिकांना जेवन देण्यात आले. जेवनानंतर बंबलेश्वरीची बीपी वाढल्याने तिला धानोरा येथील ग्रामीण रूग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी भरती केले. तिच्यासोबत आलेले नातेवाईकही रूग्णालयात थांबले.
या सर्वांना ३ डिसेंबर रोजी त्यांच्या गावाकडे रवाना करण्यात आले. या नागरिकांनी सीआरपीएफचे आभार मानले.