कोविड नियंत्रण कक्षातून मिळणार उपचारासाठी रुग्णांना मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:39 IST2021-04-23T04:39:43+5:302021-04-23T04:39:43+5:30
कोरोना बाधित रुग्णांना बेड मिळण्यासाठीचे तपशील या ठिकाणी दिले जाणार आहेत. या कोरोना नियंत्रण कक्षामध्ये सध्या फक्त बेड्सची उपलब्धता ...

कोविड नियंत्रण कक्षातून मिळणार उपचारासाठी रुग्णांना मदत
कोरोना बाधित रुग्णांना बेड मिळण्यासाठीचे तपशील या ठिकाणी दिले जाणार आहेत. या कोरोना नियंत्रण कक्षामध्ये सध्या फक्त बेड्सची उपलब्धता व गृह विलगीकरणाविषयी माहिती दिली जाणार आहे. यासाठी संपर्क क्रमांक आहेत २२२०३०, २२२०३५, २२२०३१ या नियंत्रण कक्षाच्या कामकाजाबाबत जिल्हास्तरावरील यंत्रणेचे प्रशिक्षण डॉ. विनोद मशाखेत्री यांच्याकडून देण्यात आले असून, उर्वरित व्यक्तींचे प्रशिक्षण ऑनलाईन स्वरूपात घेतले जाणार आहे.
या नियंत्रण कक्षामधून आरोग्य विभागाच्या अंतर्गत कामकाजाबाबतही काम पाहिले जाणार आहे. यासाठी प्रत्येक तालुक्यातील व जिल्हास्तरावरील रुग्णांचे व बेड्सचे तपशील एकत्रित करण्याचे कार्य केले जाणार आहे. यासाठी प्रत्येक वार्ड व कोविड सेंटरमधील आरोग्य कर्मचारी यांना गुगल स्प्रेड शीट व गुगल फॉर्म दिले आहेत. सदर कर्मचाऱ्यांनी तपशिल भरून ती माहिती जिल्हास्तरावर एकत्रित केली जाणार आहे. यातून रुग्ण सेवा व उपचाराबाबतही मदत होणार आहे.
फोटो ओळ : कोविड नियंत्रण कक्षामधील तांत्रिक प्रशिक्षणावेळी डॉ. विनोद मशाखेत्री व प्रशिक्षणार्थी.