शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागात पुन्हा वाढले गाेवऱ्यांचे ढीग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:34 IST

अनेक शेतकरी शेताच्या बांधावर असलेल्या झाडांची तोड करून या झाडांचा उपयाेग सरपणासाठी करीत आहेत. मात्र दिवसेंदिवस शेत शिवारात असणारी ...

अनेक शेतकरी शेताच्या बांधावर असलेल्या झाडांची तोड करून या झाडांचा उपयाेग सरपणासाठी करीत आहेत. मात्र दिवसेंदिवस शेत शिवारात असणारी झाडे संपुष्टात येत आहेत. पैशाच्या गरजेपोटी अनेक शेतकरी आपल्या शेतात असलेल्या बाभूळ झाडाची विक्री करीत आहेत. जिल्ह्याबाहेरील अनेक व्यापारी स्थानिक लोकांशी संपर्क करून बाभूळ झाडाचे लाकूड खरेदी करीत आहेत. त्यामुळे सरपणासाठी जळाऊ लाकडे उपलब्ध होण्यास अडचण निर्माण होत आहे. पावसाळ्यात सरपणाची अडचण भासू नये म्हणून शेतकरी महिला गुराढोरांच्या शेणाचा वापर करून गोवऱ्या तयार करीत आहेत. मात्र अलीकडच्या चार-पाच वर्षाच्या काळात पाळीव जनावरांची संख्या कमी झाल्याने शेणाचा तुटवडा जाणवत आहे. ग्रामीण भागात पूर्वी मोठ्या प्रमाणात गोधन हाेते. त्यामुळे गोवऱ्या अधिक आढळून येत होत्या. मात्र अलीकडच्या चार-पाच वर्षात पाळीव जनावरांची संख्या कमी झाल्याने शेणाचा तुटवडा जाणवत आहे.

तालुक्यातील चाकलपेठ, मुरखळा मुख्य रोडच्या बाजूला एका शेतात शेतकरी महिला गोवऱ्या तयार करीत आहेत. त्याचा वापर इंधन म्हणून केला जात आहे. गोवऱ्या थापून त्या उन्हात कडक वाळवून घरी आणल्या जातात. त्यांचा उपयाेग चूल पेटविण्यासाठी केला जात आहे.

बाॅक्स ......

गॅस सिलिंडर पडले अडगळीत

अलीकडे शासनाने महिलांच्या आरोग्याची काळजी घेत प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजना अमलात आणली. या योजनेच्या माध्यमातून गोरगरीब कुटुंबांना सवलतीच्या दरात गॅस सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. मात्र बऱ्याच कुटुंबांना गॅस सिलिंडर भरण्यासाठी दरवाढीचा फटका बसत आहे. तसेच सदर योजनेतील गॅस कनेक्शन धारकांना सिलिंडरवर सबसिडी मिळत नसल्याने सिलिंडरसाठीची पूर्ण रक्कम अदा करावी लागत आहे. त्यामुळे सर्वसामान्य गरीब कुटुंबांना गॅस सिलिंडर परवडत नाही. चामोर्शी शहर व परिसरात जळाऊ लाकूड बीट उपलब्ध करून देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.