शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
2
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
3
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
4
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
5
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
6
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
7
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
8
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
9
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
10
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
11
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
12
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
13
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
14
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
15
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
16
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
17
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
18
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
19
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
20
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

परिचारिकांच्या जीवाशी आराेग्य विभागाचा खेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:36 IST

गडचिराेली : राष्ट्रीय आराेग्य अभियानांतर्गत कंत्राटी तत्त्वावर तीन महिन्यांसाठी काेविड-१९ च्या अंमलबजावणीकरिता अधिपरिचारिकांची मुलाखत घेण्यात आली. निवड समितीने अधिपरिचारिकांची ...

गडचिराेली : राष्ट्रीय आराेग्य अभियानांतर्गत कंत्राटी तत्त्वावर तीन महिन्यांसाठी काेविड-१९ च्या अंमलबजावणीकरिता अधिपरिचारिकांची मुलाखत घेण्यात आली. निवड समितीने अधिपरिचारिकांची निवड केल्यानंतर त्यांना नियुक्ती आदेश न देताच सात दिवसांचे प्रशिक्षण पूर्ण करण्याची सक्ती केली जात आहे. या सर्व प्रकारासाठी जिल्हा रुग्णालयातील अनुपम महेशगाैरी हे अधिकारी जबाबदार असून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या डाॅक्टर सेलचे सरचिटणीस तथा डाॅ. साळवे नर्सिंग स्कूलचे संचालक डाॅ. प्रमाेद साळवे यांनी केली आहे.

सध्या राज्यात काेराेनाचे थैमान सुरू आहे. नियमित आराेग्य कर्मचारी कमी पडत असल्याने कंत्राटी तत्त्वावर वैद्यकीय अधिकारी व अधिपरिचारिकांची पदे थेट मुलाखतीने भरली जात आहेत. ९ ते १३ एप्रिल या कालावधीत मुलाखती घेण्यात आल्या. त्यानुसार १६ उमेदवारांची प्रतीक्षा यादी तयार करण्यात आली आहे. विशेष म्हणजे प्रतीक्षा यादीतील सर्वात कमी गुण असलेल्या उमेदवाराला नियुक्तीपत्र देण्यात आले आहे. मात्र त्यापेक्षा अधिक गुण असलेल्या उमेदवारांना अजूनपर्यंत नियुक्तीपत्र देण्यात आले नाही. यावरून या ठिकाणी अनियमितता व मनमानी कारभार असल्याचे दिसून येत आहे. अधिपरिचारिका पदाकरिता ज्यांनी मुलाखती दिल्यात त्यातील काहींना अनुपम महेशगाैरी या अधिकाऱ्याने नियुक्ती आदेश न देता सामान्य रुग्णालयात सात दिवसांच्या प्रशिक्षणासाठी पाठविले. मात्र नियुक्ती आदेश नसल्याने मेट्रनने मात्र प्रशिक्षण देण्यास नकार दिला. काेराेनाच्या या गंभीर स्थितीत निवड झालेल्या परिचारिकांना हेलपाटे मारायला लावले जात आहेत.

काेराेना रुग्णांची संख्या वाढत असल्याने अधिपरिचारिका व डाॅक्टरांची माेठ्या प्रमाणात गरज भासणार आहे. त्यामुळे दर साेमवारी मुलाखती घेतल्या जाणार आहेत. हा त्रास यापुढे नियुक्त हाेणाऱ्या इतरही अधिपरिचारिका व डाॅक्टरांना हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही. काेराेना वाॅर्डात काम करणे हे जीवावर बेतणारे आहे. अशाही स्थितीत काही युवती काम करण्यासाठी तयार हाेत आहेत. मात्र त्यांना वेगवेगळ्या कारणाने त्रास देण्याचा प्रयत्न सुरू आहे. हा प्रकार बंद हाेणे आवश्यक आहे, अशी मागणी डाॅ. साळवे यांनी केली आहे.

बाॅक्स...

बरेवाईट झाल्यास जबाबदार काेण?

नियुक्ती आदेश न देताच प्रशिक्षणाची सक्ती केली जात आहे. प्रशिक्षणाच्या कालावधीत अधिपरिचारिकांच्या जीवाला बरेवाईट झाल्यास यासाठी जबाबदार काेण, असा प्रश्न डाॅ. साळवे यांनी उपस्थित केला आहे. विशेष म्हणजे मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या निवड समितीने अधिपरिचारिकांची निवड केल्यानंतर अनुपम महेशगाैरी नामक अधिकारी नियुक्ती आदेश कसे काय थांबवू शकतात, असा प्रश्न उपस्थित हाेत आहे. महेशगाैरी यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पाठबळ असण्याची शक्यता नाकारता येत नाही, असा आराेप डाॅ. साळवे यांनी केला आहे.