शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
3
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
4
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
5
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
6
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
7
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
8
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
9
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
10
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
11
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
12
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
13
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
14
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
15
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
16
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
17
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
18
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
19
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
20
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"

प्रसुतीसाठी ३५ किमी अंतर चालत गाठले आरोग्य केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2019 6:00 AM

भामरागड तालुक्याला छत्तीसगड राज्याची सीमा लागून आहे. या परिसरात घनदाट जंगल आहे. जंगलाच्या वाटेने पक्क्या रस्त्यांचा अभाव आहे. त्यामुळे वाहतुकीची साधने नाहीच्या बरोबर आहेत. एखाद्या व्यक्तीकडे दुचाकी आहे, मात्र रस्ते व पूल नसल्याने पावसाळ्यात दुचाकीचा वापर करणे अशक्य होते.

ठळक मुद्देबाळ व माता सुखरूप : छत्तीसगड राज्यातील महिलेची थरारक कहाणी, कच्चा रस्ता अन् नालेही केले पार

श्यामराव येरकलवार ।लोकमत न्यूज नेटवर्कलाहेरी : आरोग्य केंद्रात प्रसुती होण्यासाठी छत्तीसगड राज्यातील नारायणपूर जिल्ह्यातल्या उसेवाडा येथील मासे कादू दुर्वा या २८ वर्षीय गरोदर मातेने सुमारे ३५ किमी अंतर पायदळ चालून लाहेरी आरोग्य केंद्र गाठले. आरोग्य केंद्रात तिची सुरळीत प्रसुती करण्यात आली असून बाळ व माता दोघेही सुखरूप आहेत. या घटनेवरून भामरागड तालुका व छत्तीसगड राज्याच्या सीमेवर असलेल्या गावांमधील विदारक परिस्थितीची पुन्हा एकदा दिसून आली.भामरागड तालुक्याला छत्तीसगड राज्याची सीमा लागून आहे. या परिसरात घनदाट जंगल आहे. जंगलाच्या वाटेने पक्क्या रस्त्यांचा अभाव आहे. त्यामुळे वाहतुकीची साधने नाहीच्या बरोबर आहेत. एखाद्या व्यक्तीकडे दुचाकी आहे, मात्र रस्ते व पूल नसल्याने पावसाळ्यात दुचाकीचा वापर करणे अशक्य होते. मासे दुर्वा ही गरोदर माता व तिचे कुटुंब पूर्णपणे निरक्षरआहे. गरोदरपणात जे आरोग्य कार्ड काढायला पाहिजे ते सुध्दा तिने काढले नव्हते. यावरून तिने यापूर्वी कोणतीही वैद्यकीय तपासणी केली नसावी हे स्पष्ट आहे.माडिया भाषेशिवाय तिला व तिच्या नातेवाईकांना दुसरी कोणतीही भाषा येत नव्हती. प्रसुतीचा कालावधी जवळ आला होता. त्यामुळे एखाद्या आरोग्य केंद्रात भरती होण्याचा सल्ला तिच्या नातेवाईकांनी दिला. छत्तीसगडमधील रहिवासी असली असली तरी तिकडे जवळपास आरोग्य केंद्र नसल्याने तिच्यासाठी ३५ किलोमीटरवर असलेले भामरागड तालुक्यातील लाहेरी येथील आरोग्य केंद्रच जवळचे होते. त्यामुळे येथे भरती होण्यास तिच्या कुटुंबियांनी प्राधान्य दिले. घनदाट जंगल, रस्त्यांचा अभाव, पावसाळ्यात वाहणारे नदी, नाले ओलांडून पायदळ प्रवास करणे तेवढे सोपे नव्हते. तरीही पायदळ आरोग्य केंद्र गाठण्याचा निर्णय त्यांनी घेतला.गरोदर माता व तिचा पती, आई, सासू व गावातील दोघांनी मिळून पायदळच ३५ किमी अंतर गाठले. आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ.संभाजी भोकरे, डॉ.संतोष नैताम यांनी तपासणी केली. १६ सप्टेंबरच्या मध्यरात्री ती प्रसूत झाली. बाळ व मातेची प्रकृती आता ठिक आहे.

टॅग्स :Pregnancyप्रेग्नंसीfloodपूर