शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
2
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
3
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
4
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
5
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
6
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
7
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
8
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
9
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
10
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
11
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
12
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
13
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
14
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
15
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
16
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
17
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
18
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
19
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
20
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

सपाटीकरण झाले डोकेदुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2019 06:00 IST

नागरिकांच्या मागणीनंतर यंदाच्या उन्हाळ्यात येथे मुरूमाऐवजी माती टाकण्यात आली. अतिवृष्टीमुळे टाकलेली माती पूर्णत: चिखलमय झाली. काही माती वाहून गेली. उन्हाळ्यात करण्यात आलेले सपाटीकरणाचे काम निकृष्ट होते, असा आरोप परिसरातील नागरिकांनी केला आहे. सध्या येथे चिखलात अनेक वाहने चिखलात फसत आहेत.

ठळक मुद्देचामोर्शी-घोट मार्ग : पाच वर्षानंतर काम, पण मातीमुळे रस्त्यावर पसरला चिखल

लोकमत न्यूज नेटवर्कघोट : चामोर्शी-घोट मार्गावर गौरीपूरनजीक पाच वर्षापूर्वी पुलाचे बांधकाम करण्यात आले. त्यानंतर चार वर्ष पुलालगत रस्त्याचे सपाटीकरण करण्यात आले नाही. यंदाच्या उन्हाळ्यात सपाटीकरण करण्यात आले. परंतु येथे गिट्टी व मुरूम न टाकता माती टाकण्यात आल्याने सध्या या ठिकाणी वाहने फसत आहेत. तसेच इतर वाहनधारकांनाही चिखलाचा सामना करावा लागत आहे.चामोर्शी वरून चार ते पाच किलोमिटरवर असलेल्या गौरीपूरनजीक पुलाच्या दोन्ही बाजूला खड्डे पडले आहेत. पाच वर्षापूर्वी येथे पुलाचे बांधकाम झाले. त्यानंतर रस्त्याच्या दोन्ही बाजूला गिट्टी व मुरूम टाकणे आवश्यक होते. परंतु सदर काम करण्यात आले नाही. नागरिकांच्या मागणीनंतर यंदाच्या उन्हाळ्यात येथे मुरूमाऐवजी माती टाकण्यात आली. अतिवृष्टीमुळे टाकलेली माती पूर्णत: चिखलमय झाली. काही माती वाहून गेली. उन्हाळ्यात करण्यात आलेले सपाटीकरणाचे काम निकृष्ट होते, असा आरोप परिसरातील नागरिकांनी केला आहे. सध्या येथे चिखलात अनेक वाहने चिखलात फसत आहेत. दुचाकी वाहनधारक घसरून पडत आहेत. या ठिकाणी गंभीर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला गिट्टी, मुरूम टाकून डांबरीकरण करणे आवश्यक आहे. यासाठी गौरीपूरसह घोट परिसरातील नागरिकांनी संबंधित विभागाकडे मागणी केली आहे.पुलावरील खड्डे धोकादायकमकेपल्ली व माडेआमगावच्या मधोमध असलेल्या नाल्यावरील पुलावर दोन मोठे खड्डे पडले आहेत. सदर मार्ग चामोर्शी रेखेगाव, मकेपल्ली, माडेआमगाव, रेगडी, विकासपल्ली, एटापल्ली कसनसूरला जोडणारा आहे. मकेपल्ली व माडेआमगाव या मार्गावरून नेहमीच वाहनांची वर्दळ असते. दिवस-रात्र वाहने आवागमन करीत असतात. त्यामुळे पुलावर पडलेल्या खड्ड्यात वाहन कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाroad transportरस्ते वाहतूक