अवकाळी पावसाने गडचिरोलीतील अवघे गाव केले उजाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2019 10:36 IST2019-04-19T10:31:18+5:302019-04-19T10:36:01+5:30
गुरुवारी रात्री ८.३० दरम्यान आलेल्या मुसळधार पावसाने व त्यात झालेल्या गारपिटीने गडचिरोली जिल्ह्यातल्या मुलचेरा तालुक्यातील देशबंधूग्राम हे लहानसे खेडेगाव उजाड केले आहे.

अवकाळी पावसाने गडचिरोलीतील अवघे गाव केले उजाड
नीरज चापले
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली:
या गावातील किमान २५-३० घरांवरचे छप्पर उडून गेल्याने गावकरी अक्षरश: उघड्यावर आले आहेत.
गुरुवारी रात्री आलेल्या मुसळधार पावसाने, सोसाट्याच्या वाऱ्याने व गारांच्या तडाख्याने देशबंधूग्राम या गावाला अक्षरश: झोडपून काढले. असंख्य घरांवरचे पत्रे व छप्पर उडून गेले. बाहेर ठेवलेल्या सामानाचे नुकसान झाले. ज्यांनी मका पेरला होता ते पीक चांगले तयार झाले असता, या पावसाने त्याला पार आडवे करून टाकले. याचसोबत फळपिकांचेही अतोनात नुकसान झाले. या वादळात गावातील विद्युत खांबही भुईसपाट झाल्याने विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. गावातील प्रफुल्ल बाच्छाड, रंजीत बाच्छाड, सुभाष सरकार, सुमरेश सरकार, निमाई पांडे आदी शेतकऱ्यांनी सरकारने मदत करावी अशी मागणी केली आहे.