वीज बिलात सवलत घ्या
By Admin | Updated: June 29, 2014 23:55 IST2014-06-29T23:55:06+5:302014-06-29T23:55:06+5:30
शेतकऱ्यांवरील थकबाकीचा बोजा कमी करण्याच्या दृष्टीने व थकबाकीची वसूली प्रभावीरित्या करण्याकरिता शासन विद्युत वितरण कंपनीच्या माध्यमातून गरीब व पीडित शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन

वीज बिलात सवलत घ्या
कृषी संजीवनी योजना : बिल थकबाकी शेतकऱ्यांना कृषी सभापतींचे आवाहन
गडचिरोली : शेतकऱ्यांवरील थकबाकीचा बोजा कमी करण्याच्या दृष्टीने व थकबाकीची वसूली प्रभावीरित्या करण्याकरिता शासन विद्युत वितरण कंपनीच्या माध्यमातून गरीब व पीडित शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन वीज बिल थकबाकीत सवलत देत आहे. त्यानुसार कृषी संजीवनी योजना राज्यात लागू करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी वीज बिल थकबाकीत सवलत घ्यावी, असे आवाहन जि. प. चे कृषी सभापती अतुल गण्यारपवार यांनी केले.
कृषी संजीवनी योजनेअंतर्गत मार्च २०१४ पर्यंत मूळ रक्क मेची ५० टक्के रक्कम एकरकमी किंवा ३ मासिक हप्त्यात उरलेली ५० टक्के मूळ थकीत रक्कम शासनातर्फे अदा करण्यात येते. तसेच योजनेत भाग घेणाऱ्या कृषी ग्राहकांचे मार्च २०१४ रोजी थकीत असलेले पूर्ण व्याज व दंड महावितरणतर्फे माफ केले जाते. कृषी ग्राहकांना ५० टक्के मूळ थकबाकीची रक्कम, आॅगस्ट पर्यंत २० टक्के, सप्टेंबर २० तर आॅक्टोबर २०१४ पर्यंत १० टक्के कमीतकमी रक्कम भरावी लागणार आहे किंवा ५० टक्के मुळ थकबाकी रक्कम एकरक्कमी आॅगस्टपूर्वी भरता येऊ शक ते. योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना एप्रिलनंतर चालू बिल पूर्णपणे भरणे आवश्यक करण्यात आले आहे.
मार्च २०१४ रोजी जे ग्राहक थकबाकीदार राहणार नाही. अशांना पुढील २ त्रैमासिक बिले ५० टक्के माफ करण्यात येतील व माफ केलेली रक्कम शासनातर्फे विद्युत कंपनीला अदा केली जाईल.
ज्या शेतकऱ्यांनी या योजनेत सहभाग घेतला नाही किंवा योजनेअंतर्गत ठरविण्यात आलेल्या रक्कमेचा भरणा केला नाही अशा ग्राहकांना अपात्र ठरविले जाते. ग्रामसभा, ग्रामपंचायत सदस्य, पंचायत समिती जिल्हा परिषदेचे लोकप्रतिनिधींकडून सदर योजनेची माहिती शेतकऱ्यांना मिळू शकते. शेतकऱ्यांना कृषी संजीवनी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जि.प. चे कृषी, पशुसंवर्धन व दुग्धशाळा समिती सभापती अतुल गण्यारपवार यांनी केले. (शहर प्रतिनिधी)