शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींची २ तासांची 'पावर व्हिजिट'! चालता चालता UAE सोबत ४७९६२०७५०००० ची डील केली!; भारताचं तेल-गॅस संकट कायमचं मिटणार?
2
१५ राज्यांना ११ तास महत्त्वाचे, मोठे वादळ, गडगडाटासह पावसाचा इशारा; महाराष्ट्रात काय होणार?
3
होर्मुझ तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताचा मोठा निर्णय, थेट ओमान-UAE पर्यंत अंथरणार 'पाइपलाइन'; किती खर्च येणार? 
4
भोजशाळा हे सरस्वती मंदिरच! मध्य प्रदेश हायकोर्टाच्या निकालावर असदुद्दीन ओवैसी काय म्हणाले? बाबरी प्रकरणाशी जोडला संबंध
5
खळबळजनक! टरबूज खाल्ल्याने वडिलांचा मृत्यू, मुलाची प्रकृती चिंताजनक; श्योपूरमधील धक्कादायक घटना
6
इराणची पुन्हा भारताला साद; परराष्ट्र मंत्री म्हणाले, “शांततेसाठी भूमिका घ्यावी, स्वागत करू”
7
“८ महिने झाले तरी GR काढला नाही”; पुन्हा आंदोलनाची हाक, मनोज जरांगे पाटील तारीख जाहीर करणार
8
‘एक्स्प्रेस वे’वर पुन्हा कोंडी, पुण्याहून मुंबईकडे येणारी वाहतूक कोलमडली; ‘मिसिंग लिंक’ही ठप्प
9
पाकिस्तानची लाज निघाली..!! आधी बांगलादेशकडून हरले, त्यात आता WTCचे गुण कमी झाले, काय घडलं?
10
PM मोदींच्या आवाहनानंतर सुप्रीम कोर्टाचाही मोठा निर्णय! आता 'मीलॉर्ड'देखील 'WFH'सह करणार 'कार पूलिंग'
11
कोकणातील काजू आंबा उत्पादक शेतकऱ्यांचा मुंबईत धडक मोर्चा, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड
12
"पहिल्याच दिवशी स्पष्ट सांगा की मी महत्त्वाचा नाही किंवा..."; २०२७ वर्ल्डकपबाबत विराटचे सूचक विधान
13
बेरोजगारांची झुरळाशी तुलना; CJI म्हणाले, “सोशल मीडिया-RTI कार्यकर्ते बनून यंत्रणा कुरतडतात”
14
STचे तिकीट वाढणार? १२५ कोटींचा भार, डिझेल दरवाढीचा फटका; प्रताप सरनाईकांचे मोठे संकेत
15
शनि नक्षत्र गोचर २०२६: ५ राशींनी ५ उपाय अवश्य करा, शनि देईल लाभच लाभ; अधिक मास ठरेल खास!
16
सूर्य वृषभ संक्रांती २०२६: ७ राशींना यश-प्रगती, नफा-फायदा; १ उपाय करा, १ महिना चांगला लाभ!
17
Top Marathi News LIVE: नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला ६ दिवसांची सीबीआय कोठडी
18
शासनाचे काम लोकाभिमुख, गतिमान आणि पारदर्शक; मुंबईतील लाभार्थ्यांना विविध लाभांचे वितरण
19
ट्रम्प-जिनपिंग भेटीवर रशियाची पहिली प्रतिक्रिया! 'त्या' ४० तासांच्या चर्चेत नेमकं काय घडलं? पुतिन लवकरच चीनला जाणार
20
मोदीजी जे सांगत आहेत ते देशहितासाठीच, देशभक्ती सिद्ध करण्याची हीच वेळ- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

श्रमदानातून तलावातील जलकुंभी वनस्पतींची काढणी

By admin | Updated: June 15, 2015 01:40 IST

शहराच्या मध्यभागी असलेल्या तलावात जलकुंभी वनस्पती मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सदर वनस्पती काढण्याची मोहीम ढिवर व भोई समाजातील...

पे्ररणादायी उपक्रम : भोई व ढीवर समाजाचा पुढाकार
चामोर्शी : शहराच्या मध्यभागी असलेल्या तलावात जलकुंभी वनस्पती मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सदर वनस्पती काढण्याची मोहीम ढिवर व भोई समाजातील नागरिकांनी शुक्रवारपासून हाती घेतली. त्यांच्या या कार्याची नागरिकांकडून प्रसंशा केली जात आहे.
भोई व ढिवर समाजाची जय वाल्मिकी मासे पाणी संस्थाही नोंदणीकृत आहे. या संस्थेला सदर तलावातील मासे पकडण्याचे अधिकार पंचायत समिती प्रशासनाकडून लिजवर देण्यात आले आहेत. जय वाल्मिकी संस्था दरवर्षी या तलावात मत्स्यबिज सोडून मासेमारीचा व्यवसाय करते. मात्र मागील काही वर्षांपासून या तलावात मोठ्या प्रमाणात जलकुंभी वनस्पती वाढली. त्यामुळे मासेमारीस अडचण निर्माण होत होती. त्याचबरोबर याचा परिणाम मास्यांच्या वाढीवरही झाला होता. याबाबत पंचायत समिती व जिल्हा परिषद सिंचाई विभागाकडे पाठपुरावा करून सदर वनस्पती काढण्याची अनेकवेळा मागणी केली. मात्र प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले. परिणामी भोई व ढिवर समाजाच्या नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने तलावातील जलकुंभी वनस्पती काढण्याच्या कामाला शुक्रवारपासून सुरूवात केली.
तिसऱ्या दिवशीही सदर मोहीम सुरूच होती. यामध्ये भोई व ढिवर समाजाच्या शेकडो महिला व पुरूषांनी सहभाग घेतला आहे. याच तलावात शहरातील गणपती, दुर्गा, शारदा यांचे विर्सजनही केले जाते. त्यामुळे नगर पंचायतीनेही सदर वनस्पती काढण्यासाठी भोई व ढिवर समाजाच्या नागरिकांना सहकार्य करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. (शहर प्रतिनिधी)
कपडे धुण्यासही अडचण
सदर तलाव शहराच्या मध्यभागी असल्याने शहरातील शेकडो महिला या तलावात कपडे धुण्यासाठी जातात. प्रशासनाच्या वतीने तीन धोबीघाट तयार करण्यात आले आहेत. या धोबीघाटांजवळही जलकुंभी वनस्पती वाढली असल्याने महिलांना कपडे धुण्यास अडचण येत आहे.
जिल्ह्यातील शेकडो तलावांमध्ये अशा प्रकारच्या वनस्पती वाढल्या आहेत. त्यामुळे या तलावांची पाणी साठवण क्षमता कमी झाली आहे. त्याचबरोबर त्यांचे सौंदर्यही धोक्यात आले आहे. श्रमदानातून तलावांना पुनर्वैभव प्राप्त करून देणे शक्य आहे.