हरिषबाबा आत्राम यांचे निधन
By Admin | Updated: July 1, 2014 01:27 IST2014-07-01T01:27:45+5:302014-07-01T01:27:45+5:30
माजी राज्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धर्मरावबाबा आत्राम यांचे धाकटे बंधू, गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष हरिषबाबा भगवंतराव आत्राम यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने नागपूर

हरिषबाबा आत्राम यांचे निधन
अहेरीवर शोककळा : आज होणार अंत्यसंस्कार
अहेरी : माजी राज्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धर्मरावबाबा आत्राम यांचे धाकटे बंधू, गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष हरिषबाबा भगवंतराव आत्राम यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने नागपूर येथे खासगी रूग्णालयात सोमवारी निधन झाले. ते ५७ वर्षाचे होते. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच अहेरी राजनगरीवर शोककळा पसरली.
गेल्या काही दिवसांपासून हरिषबाबा आत्राम हे आजारी असल्याने त्यांना नागपूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती दिवसेंदिवस ढासळत गेली व आज त्यांची प्राणज्योत मालवली. गडचिरोली जिल्हा परिषदेचे ते पाच वर्ष उपाध्यक्ष होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली, पाच भाऊ, दोन बहिणी असा बराच मोठा आप्त परिवार आहे. त्यांच्या पार्थीवावर आज अहेरी येथे सकाळी ११ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
हरिषबाबा आत्राम हे भगवंतराव मेमोरिअल एज्युकेशन सोसायटीचेही विश्वस्त होते. ते २००२ ते २००८ या कालावधीत गडचिरोली जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष होते. त्यांनी अहेरी व चामोर्शी तालुक्यातून जिल्हा परिषदेवर प्रतिनिधीत्व केले होते. जि.प.च्या माध्यमातून त्यांनी अनेक चांगले व लोकाभिमुख निर्णय घेतले होते. (प्रतिनिधी)