गुरूजी, शाळा कधी सुरू होणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2020 05:01 IST2020-08-30T05:00:00+5:302020-08-30T05:01:07+5:30

विसोरा येथील शेकडो विद्यार्थी तथा पालकांशी प्रत्यक्ष भेट घेऊन कोरोनाने बंद असलेली शाळा पुन्हा सुरू झाल्यास आपण आपल्या पाल्यास शाळेत पाठवायला तयार आहात का यावर वातार्लाप केला असता विद्यार्थी, पालकांनी अगदी सकारात्मक प्रतिक्रिया दिली. मार्च महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात सुरू झालेला कोरोना लॉकडॉऊन दिवसेंदिवस अनलॉक होत असला तरी शाळा त्याला अपवाद ठरत आहे. एकूणच आजघडीला विद्यार्थ्यांना तब्बल पाच महिन्यांच्या सुट्ट्या मिळाल्या आहेत.

Guruji, when will the school start? | गुरूजी, शाळा कधी सुरू होणार?

गुरूजी, शाळा कधी सुरू होणार?

ठळक मुद्देग्रामीण पालक चिंताग्रस्त । विद्यार्थी विचारताहेत प्रश्न

लोकमत न्यूज नेटवर्क
विसोरा : गुरुजी! शाळा कधी सुरू होणार आहे ? असा प्रश्न विद्यार्थी आणि पालकांकडून शिक्षकांना विचारला जात आहे. शाळेप्रती आपुलकी व जिव्हाळा दाखवणारा हा प्रश्न. यंदा शाळेचे नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होऊन ६५ दिवस पुर्ण झाले मात्र विद्यार्थ्यांना अजूनही शाळा प्रवेशबंदी कायम आहे. त्यामुळे शाळेतील शिक्षण बंद असल्याने विद्यार्थी बिनधास्त मात्र विद्यार्थ्यांच्या भविष्याने पालक अस्वस्थ झाले आहेत.
विसोरा येथील शेकडो विद्यार्थी तथा पालकांशी प्रत्यक्ष भेट घेऊन कोरोनाने बंद असलेली शाळा पुन्हा सुरू झाल्यास आपण आपल्या पाल्यास शाळेत पाठवायला तयार आहात का यावर वातार्लाप केला असता विद्यार्थी, पालकांनी अगदी सकारात्मक प्रतिक्रिया दिली. मार्च महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात सुरू झालेला कोरोना लॉकडॉऊन दिवसेंदिवस अनलॉक होत असला तरी शाळा त्याला अपवाद ठरत आहे. एकूणच आजघडीला विद्यार्थ्यांना तब्बल पाच महिन्यांच्या सुट्ट्या मिळाल्या आहेत. भविष्यात सुट्या आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येण्यासारखी परिस्थिती नाही. यादरम्यान विद्यार्थी शाळेतील शिक्षणापासून दूर आहे. ऑनलाईन शिक्षण चालू आहे पण त्यात ग्रामीण विद्यार्थी, पालक भरडले जात आहेत. वास्तवात पालक केवळ आणि केवळ ऑफलाईनला पसंती देत आहेत.
शाळा बंद होऊन आज तब्बल दीडशे दिवसांचा कालावधी झाला आहे. आता विद्यार्थ्याला शाळेत जाण्याची उत्सुकता आहे. पालक सुद्धा सकारात्मक दिसून येतात. पण कोरोनामुळे विद्यार्थ्यांसाठी शाळा कधी सुरू होणार हे अनिश्चित आहे. संचारबंदी असल्याने बिनधास्त गावाबाहेर नातेवाईकांना भेटायला जाणे शक्य नाही. मुले-मुली घरच्या घरी खोडकरपणा करण्यात, खेळण्यात इतके बेभान झालेत कि ते आता आई-बाबा, आजी-आजोबा यांना ऐकत नाही अशा तक्रारी वाढू लागल्यात.
परिणामी पालकांना विद्यार्थ्यांच्या भविष्याबद्दल काळजी वाटू लागली आहे. गावात, रस्त्यात, घराजवळ शिक्षक दिसताच विद्यार्थी सर, शाळा कधी सुरू होणार? असा प्रश्न करीत आहे.

ऑनलाईन शिक्षणात खोडा
कोरोनामुळे शाळांमधील वर्ग प्रत्यक्ष भरणे बंद आहे. त्यामुळे शहरी व ग्रामीण भागात ऑनलाईन शिक्षण देण्याचा प्रयत्न शाळांकडून सुरू आहे. मात्र आरमोरी तालुक्यासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागात इंटरनेटची गती नसल्याने ऑनलाईन शिक्षण प्रक्रियेत अडचणी येत आहे.

Web Title: Guruji, when will the school start?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.