बोडधात सुकन्या योजनेविषयी मार्गदर्शन
By Admin | Updated: August 24, 2014 23:31 IST2014-08-24T23:31:07+5:302014-08-24T23:31:07+5:30
स्त्री भ्रूणहत्येवर पायबंद घालण्यासाठी शासनाच्या महिला व बालकल्याण विभागामार्फत सुकन्या योजना राबविली जात आहे. या योजनेविषयी शनिवारी बोडधा येथे मार्गदर्शन कार्यक्रम पार पडला.

बोडधात सुकन्या योजनेविषयी मार्गदर्शन
जोगीसाखरा : स्त्री भ्रूणहत्येवर पायबंद घालण्यासाठी शासनाच्या महिला व बालकल्याण विभागामार्फत सुकन्या योजना राबविली जात आहे. या योजनेविषयी शनिवारी बोडधा येथे मार्गदर्शन कार्यक्रम पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त वैद्यकीय अधिकारी डॉ. एच. एन. नंदेश्वर होते. यावेळी सुकन्या योजनेच्या अंमलबजावणीविषयी माहिती देण्यात आली. सुकन्या योजना १ जानेवारी २०१४ पासून राबविली जात आहे. या योजनेंतर्गत १ जानेवारी २०१४ नंतर जन्मास येणाऱ्या प्रत्येक मुलीकरिता १८ वर्षानंतर १ लाख रूपये देण्याची सोय आहे. मुलीच्या जन्मानंतर शासन २१ हजार रूपये जमा करून घेते. त्यानंतर १८ वर्ष पूर्ण झाल्यानंतर सदर मुलीला याचा लाभ दिल्या जातो. दर सहा महिन्यांनी ६०० रूपये शिष्यवृत्ती तसेच वडिलाचे अपघाती निधन झाल्यास आम आदमी विमा अंतर्गत ३० ते ७० हजार लाभ मिळू शकतो. सदर योजनेचा लाभ दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांनाच देण्यात येतो, अशी माहिती आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात मान्यवरांनी यावेळी दिली. कार्यक्रमाला बोडधा परिसरातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.