कृषी सप्ताहानिमित्त शेतकऱ्यांना मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:27 IST2021-06-06T04:27:27+5:302021-06-06T04:27:27+5:30
सप्ताहाच्या पहिल्यादिवशी आकापूर चक, शिवनी खुर्द, कोजबी, वासाळा, सिर्सी, देलोडा खुर्द, दवंडी, पिसेवडधा, देलोडा (बु.) आदी गावांमध्ये कृषी ...

कृषी सप्ताहानिमित्त शेतकऱ्यांना मार्गदर्शन
सप्ताहाच्या पहिल्यादिवशी आकापूर चक, शिवनी खुर्द, कोजबी, वासाळा, सिर्सी, देलोडा खुर्द, दवंडी, पिसेवडधा, देलोडा (बु.) आदी गावांमध्ये कृषी सप्ताहाच्या मोहिमेला उत्साहात सुरुवात करण्यात आली. यामध्ये कृषी सहायक व कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांना प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन केले. विशेषतः आकापूर चक येथे कृषी सप्ताहानिमित्त फळबाग लागवड या विषयावर मंडल कृषी अधिकारी जी. एन. जाधवर यांनी, तर बीज प्रक्रिया व बियाणांची उगवणक्षमता तपासणे या विषयावर कृषी पर्यवेक्षक ए. आर. हुकरे यांनी, विकेल ते पिकेल, मार्केटिंग, निर्यात, काढणीपश्चात तंत्रज्ञान व सेंद्रिय शेती या विषयावर तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक व्ही. डी. रहांगडाले, एका गावात ए. वाण या विषयावर कृषी उपसंचालक वसवाडे यांनी, खत व्यवस्थापन या विषयावर तंत्र अधिकारी बादाडे, शेतीशाळा या विषयावर कृषी सहायक वाय. एच. सहारे यांनी, भात लागवड तंत्रज्ञान व पीक संरक्षण या विषयावर तालुका कृषी अधिकारी टी. डी. ढगे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
कृषी सहायक डी. के. क्षीरसागर यांनी संचालन करून उपस्थितांचे आभार मानले.