शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
5
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
6
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
7
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
8
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
9
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
10
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
11
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
12
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
13
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
14
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
15
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
16
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
17
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
18
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
19
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
20
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
Daily Top 2Weekly Top 5

पालकमंत्री संपूर्ण जिल्ह्याचे की, केवळ अहेरीचे

By admin | Updated: January 8, 2015 22:54 IST

राज्य सरकारने नागपूर हिवाळी अधिवेशनानंतर राज्यातील पालकमंत्र्यांच्या नावाची घोषणा केली. गडचिरोलीचे पालकमंत्री म्हणून राज्यमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांची वर्णी लागली आहे.

गडचिरोली : राज्य सरकारने नागपूर हिवाळी अधिवेशनानंतर राज्यातील पालकमंत्र्यांच्या नावाची घोषणा केली. गडचिरोलीचे पालकमंत्री म्हणून राज्यमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांची वर्णी लागली आहे. मात्र पालकमंत्री गडचिरोली जिल्ह्यात सर्व भागात कार्यक्रमांना जाण्याऐवजी केवळ आपल्याच अहेरी विधानसभा क्षेत्रात कार्यक्रमांना हजेरी लावत असल्याने पालकमंत्री अहेरीचे की, गडचिरोलीचे अशी चर्चा प्रशासकीय वर्तुळातही सुरू झाली आहे. २०१० मध्ये आर. आर. पाटील यांच्यासारख्या जबाबदार मंत्र्यांकडे गडचिरोलीच्या पालकमंत्री पदाची धुरा होती. महिन्याला दोनदा ना. पाटील गडचिरोलीच्या दौऱ्यावर येत होते. २०१० ते २०१४ या कालावधीत ना. पाटील यांनी साडेतीनशेवर दौरे गडचिरोली जिल्ह्यात केले. त्यामुळे त्यांची सामान्य माणसाप्रती असलेली आस्था यातून दिसून येत होती. विकासाच्या निधीतही त्यांनी जिल्हा विकास योजनेत प्रचंड मोठी वाढ केली. आता भाजपसेना सरकारच्या काळात अम्ब्रीशराव महाराज यांच्याकडे पालकमंत्री पदाची धुरा आली आहे. नागपूर हिवाळी अधिवेशनापासून अम्ब्रीशराव महाराजांनी गडचिरोलीत केवळ तीनवेळा हजेरी लावली. पालकमंत्री होण्यापूर्वी २४ नोव्हेंबर रोजी ते मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यासाठी आले. त्यानंतर गृहराज्यमंत्री प्रा. राम शिंदे यांच्यासोबत केवळ पोलीस मुख्यालयाच्या कार्यक्रमासाठी आले. त्यानंतर नागपूर अधिवेशन संपल्यानंतर स्वत:च्या सत्कार कार्यक्रमासाठी पालकमंत्री गडचिरोलीत आले. याचवेळी त्यांनी देसाईगंज, आरमोरी, गडचिरोली, चामोर्शी, घोट या भागाचा धावता दौरा केला. गडचिरोलीचे स्थानिक पालकमंत्री असताना त्यांनी येथे विविध विभागाच्या आढावा बैठका घेण्याची अपेक्षा लोकांना होती. अकाली पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे अनेक ठिकाणी धान्य भिजले. परंतु पालकमंत्री शेतकऱ्यांचे अश्रु पुसण्यासाठीही आले नाही. केवळ अहेरी भागातच आपला दौरा करून आपल्या मतदारसंघावरच लक्ष केंद्रीत करण्याचे काम पालकमंत्री करीत आहेत. सिरोंचा येथे पालकमंत्र्यांची मिरवणुक काढण्यात आली. दवाखान्यासमोर सायलेंट झोन असतांना जोरदार ढोल ताशे बदडण्यात आले. ज्या क्रीडा संमेलनाचे पालकमंत्र्यांच्याहस्ते उद्घाटन आहे. तेथेही तास ते दीड तास विलंबाने ते पोहोचतात, असे लोकप्रतिनिधीही सांगत आहेत. त्यामुळे पालकमंत्र्यांविषयी सध्या प्रचंड चर्चा जनमाणसात आहे. या पालकमंत्र्यांकडून विकासाची फारशी अपेक्षा नाही, अशी प्रतिक्रीया जिल्ह्यातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. (जिल्हा प्रतिनिधी)